RCB Vs MI, IPL 2020: मुंबई इंडियन्सने टॉस जिंकला, प्रथम गोलंदाजी करण्याचा घेतला निर्णय

आयपीएलच्या तेराव्या हंगामातील 10 व्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (Royal Challengers Bangalore) आणि मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) यांच्यात आज दुबई आंतरराष्ट्रीय मैदानात एकमेकाशी भिडणार आहेत. दरम्यान, मुंबई इंडियन्सच्या संघाने नाणेफेक जिंकून प्रथम करण्याचा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवरील सामन्यात आपल्या संघाला जिंकवणे हे गोलंदाजांवर अवलंबून आहे. या हंगामात आतापर्यंत येथे 4 सामने खेळले गेले आहेत. चारही सामन्यात प्रथम फलंदाजी करणारा संघ विजयी झाला आहे. यामुळे रॉयल चॅलेंजर्स बंगळरु विरुद्ध मुंबई इंडियन्स यांच्यात होणाऱ्या लढतीत कोणता संघ बाजी मारेल? हे सामना संपल्यानंतरच स्पष्ट होणार आहे.

मुंबई आणि बेंगळुरू या दोन्ही संघाचा आयपीएलच्या तेराव्या हंगामातील तिसरा सामना आहे. यापूर्वी दोन्ही संघांचा 2 सामन्यांपैकी एकात विजय झाला आहे, तर, एका सामन्यात पराभव स्विकारावा लागला आहे. या हंगामाच्या पहिल्या सामन्यात मुंबई इंडियन्सचा चेन्नई सुपर किंग्जच्या संघाने पराभव केला होता. त्याच वेळी रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूला किंग्ज इलेव्हन पंजाबकडून पराभवाला सामोरे जावे लागले होते. यामुळे हा सामना दोन्ही संघासाठी महत्वाचा ठरणार आहे. हे देखील वाचा- Rohit Sharma May Set New Record: आयपीएलमध्ये 200 षटकारांचा टप्पा गाठल्यानंतर मुंबई इंडियन्स संघाचा कर्णधार रोहित शर्मा आणखी एका विक्रमापासून केवळ 10 धावा दूर

आयपीएलच्या पहिल्या नऊ सामन्यांनंतर गुणतालिकेमध्ये दिल्ली कॅपिटल्स आणि राजस्थान रॉयल्स प्रत्येकी 2 विजयांसहीत 4 गुणांसोबत पहिल्या आणि दुसऱ्या स्थानी आहेत. नेट रनरेटच्या हिशोबाने दिल्ली कॅपिटल्स राजस्थान रॉयल्सपेक्षा सरस असल्याने दिल्ली अव्वल स्थानी आहे. पंजाब, मुंबई, कोलकात्ता, चेन्नई, बंगळुरु हे पाचही संघांनी प्रत्येकी एका विजयासहीत दोन गुण मिळवले आहेत. त्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर किंग्ज इलेव्हन पंजाब, चौथ्या क्रमांकावर मुंबई इंडियन्स, पाचव्या क्रमांकावर कोलकाता नाईट राईडर्स, सहाव्या क्रमांकावर चेन्नईसुपर किंग्ज आणि सातव्या क्रमांकावर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा संघ आहे. मालिकेतील आपले पहिले दोन्ही सामने गमावल्याने सनरायझर्स हैदराबादला अजून गुणतालिकेमध्ये भोपळाही फोडता न आल्याने ते तळाशी आहेत.