रोहित शर्मा (Photo Credit: Instagram)

आयपीएलच्या तेराव्या हंगामातील 10 व्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (Royal Challengers Bangalore) आणि मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) यांच्यात आज दुबई आंतरराष्ट्रीय मैदानात एकमेकाशी भिडणार आहेत. या स्पर्धेत दोन्ही संघानी या हंगामात एक सामना गमावला आहे तर एका सामन्यात विजय मिळवला आहे. आजचा सामना कोण जिंकणार? हे सांगणे कठीण आहे. मात्र, या सामन्यात मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) आणखी एका विक्रमाला गवसणी घालू शकतो. रोहित शर्मा आयपीएलमध्ये 5 हजार धावांचा टप्पा गाठण्यापासून केवळ 10 धावा दूर आहे.

रोहित शर्माने 190 सामन्यात 31.78 च्या सरासरीने 4990 धावा केल्या आहेत. आयपीएलमध्ये आतापर्यंत फक्त दोन फलंदाजांनी 5 हजारांहून अधिक धावा केल्या आहेत. या यादीत रॉयल चॅलेंजर्स बंगळरूचा कर्णधार विराट कोहली अव्वल स्थानी आहे. त्याने 178 सामन्यात 37.68 च्या सरासरीने 5426 धावा केल्या आहेत. तर, दुसऱ्या स्थानावर असलेल्या चेन्नई सुपर किंग्जचा तडाखेबाज खेळाडू सुरेश रैनाने 193 सामन्यात 33.34 च्या सरासरीने 5368 धावा केल्या आहेत. हे देखील वाचा-RCB Vs MI 2020 Live Streaming: रॉयल चॅलेंजर्स बंगळरू विरुद्ध मुंबई इंडियन्स यांच्यातील आयपीएल लाईव्ह सामना आणि स्कोर पाहा Disney आणि Star Network वर

कर्णधार रोहित शर्मा हा मुंबईचा सर्वात महागडा खेळाडू आहे. संघ त्याला एका पर्वाचे 15 कोटी रुपये देतात. गेल्या अनेक हंगामापासून मुंबई इंडियन्सचे नेतृत्व रोहित शर्मा करत आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सच्या संघाने आयपीएलचे 4 किताब आपल्या नावावर केले आहेत आहे. दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवरील सामन्यात आपल्या संघाला जिंकवणे हे गोलंदाजांवर अवलंबून आहे. या हंगामात आतापर्यंत येथे 4 सामने खेळले गेले आहेत. चारही सामन्यात प्रथम फलंदाजी करणारा संघ विजयी झाला आहे.