RCB Vs MI 2020 Live Streaming: रॉयल चॅलेंजर्स बंगळरू विरुद्ध मुंबई इंडियन्स यांच्यातील आयपीएल लाईव्ह सामना आणि स्कोर पाहा Disney आणि Star Network वर
Mumbai Indians vs Royal Challengers Bangalore (Photo Credits: File Photo)

आयपीएलच्या तेराव्या हंगामातील 10 व्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स विरुद्ध मुंबई इंडियन्स (Royal Challegers Bangalore Vs Mumbai Indians) आज एकमेकांशी भिडणार आहेत. दुबई आतंरराष्ट्रीय मैदानात हा सामना खेळला जाणार आहे. भारताचा कर्णधार विराट कोहली रॉयल चॅलेंजर्स बंगळरू संघाचे कर्णधार पद संभाळत आहे. तर, भारताचा उप-कर्णधार रोहित शर्मा मुंबई इंडियन्सचे नेतृत्व करत आहेत. भारतीय वेळेनुसार, आज 28 सप्टेंबर रोजी सायंकाळी 7 वाजता टॉस होणार असून सामना 7.30 वाजता सुरु होणार आहे. या सामन्याचे थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर पाहता येणार आहे. तसेच Disney+ Hotstar अ‍ॅपवरदेखील या सामन्याचे थेट प्रक्षेपण पाहता येणार आहे. रिलायन्स जिओ (Reliance Jio) आणि एअरटेलने त्यांच्या ग्राहकांना काही खास ऑफर दिल्या आहेत ज्याच्या उपयोग करून यूजर्स ऑनलाईन मॅच पाहू शकतात.

विराट कोहली आणि रोहित शर्मा हे दोघेही आज आयपीएलमध्ये एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. त्यामुळे आजच्या सामन्यात मुंबई इंडियन्स बाजी मारते की आरसीबीचा संघ विजय मिळवतो, याची उत्सुकता चाहत्यांना असेल. पहिल्या नऊ सामन्यांनंतर गुणतालिकेमध्ये मुंबई इंडियन्सचा संघ चौथ्या स्थानावर आहे. तर, रॉयल चॅलेंजर्स बंगळरूचा संघ सातव्या स्थानावर आहे. हे देखील वाचा- Rahul Tewatia Comeback: राहुल तेवतियावर Netizens फिदा; RRच्या विक्रमी विजयाच्या शिल्पकाराच्या डावावर 'Netflix सीरीजची' गरज असल्याचं म्हणत केलं तोंडभरून कौतुक

रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरः

ऐरोन फिंच, देवदत्त पद्धिकल, पार्थिव पटेल, विराट कोहली (कर्णधार), एबी डिव्हिलियर्स, गुरकीरतसिंग, शिवम दुबे, ख्रिस मॉरिस, वॉशिंग्टन सुंदर, शाहबाज अहमद, नवदीप सैनी, डेल स्टेन, युजवेंद्र चहल, ऍडम झंपा, इसुरू उदाना, मोईन अली, जोश फिलिप, पवन नेगी, पवन देशपांडे, मोहम्मद सिराज, उमेश यादव

मुंबई इंडियन्सः

रोहित शर्मा (कर्णधार), आदित्य तारे, अनमोलप्रीत सिंग, अनुकुल रॉय, ख्रिस लिन, धवल कुलकर्णी, दिग्विजय देशमुख, हार्दिक पांड्या, ईशान किशन, जेम्स पॅटिसन, जसप्रीत बुमराह, जयंत यादव, किरोन पोलार्ड, कृणाल पंड्या, मिशेल मॅकक्लेनाघन , मोहसीन खान, नॅथन कूल्टर-नाईल, प्रिन्स बलवंत राय, क्विंटन डी कॉक, राहुल चहर, सौरभ तिवारी, शेरेफान रदरफोर्ड, सूर्यकुमार यादव, ट्रेंट बाउल्ट