MI vs CSK, IPL 2019: चेन्नई सुपर किंग्स संघ कर्णधार धोनी ह्याने जिंकला टॉस, प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय
MI Vs CSK, IPL 2019 (Photo Credits-File Image)

MI vs CSK, IPL 2019: इंडियन प्रिमियर लीग (IPL) मधील आज 15 व्या सामन्यात गेल्या वर्षातील विजयी संघ चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) आणि मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) यांचा सामना वानखेडे स्टेडिअमवर रंगणार आहे. तर चेन्नई सुपर किंग्स संघाचा कर्णधार महेंद्र सिंग धोनी (MS Dhoni) याने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

चेन्नईच्या संघाला या सीझनमध्ये सुरुवातीच्या तीन सामन्यात विजय मिळाला आहे. तर मुंबई संघ अद्याप फक्त एकाच सामन्यात विजयी झाला आहे. तर पंजाब विरुद्धच्या सामन्यात मुंबईच्या संघाला पराभव स्विकारावा लागला होता. तर यंदाच्या सीझनमध्ये मुंबईच्या संघाला पराभवाला सामोरे जावे लागत आहे.(हेही वाचा-MI vs CSK, IPL 2019 Live Cricket Streaming and Score: मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स संघाचा समना लाईव्ह सामना हॉटस्टारवर पाहता येणार)

संघातील संभावित खेळाडू:

चेन्नई सुपर किंग्स संघ: अंबाती रायडू, शेन वॅटसन, सुरेश रैना, महेंद्र सिंग धोनी (कर्णधार आणि विकेटकिपर), केदार जाधव, रवींद्र जडेजा, ड्वायन ब्रावो, दीपक चहर, शार्दुल ठाकुर, हरभजन सिंह, इमरान ताहिर, मुरली विजय, ध्रुव शौरे, फाफ डु प्लेसिस, ऋतुराज गायकवाड, मिशेल सैंटनर, डेविड विली, सॅम बिलिंग्स, समीर, मोनू कुमार, कर्ण शर्मा, केएम आसिफ, मोहित शर्मा.

मुंबई इंडियन्स संघ: रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पांड्या, युवराज सिंह, क्रुणाल पांड्या, ईशान किशन (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव, मयंक मारकंडे, राहुल चहर, अनूकुल रॉय, सिद्धेश लाड, आदित्य तारे, क्विंटन डी कॉक, एविन लुइस, केरन पोलार्ड, बेन कटिंग, मिशेल मैकक्लेनेघन, एडम मिल्ने, जेसन बेहरेनडॉर्फ, अनमोलप्रीत सिंह, बरिंदर सरण, पंकज जायसवाल, रसिख सलाम, जसप्रीत बुमराह.