MI vs CSK, IPL 2019 Live Cricket Streaming and Score: मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स संघाचा समना लाईव्ह सामना हॉटस्टारवर पाहता येणार
मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स (फोटो सौजन्य-फाइल इमेज)

MI vs CSK, IPL 2019 Live Cricket Streaming and Score: आयपीएलच्या (IPL) 12 व्या सीझन मधील आज मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) संघाचा चित्तथरारक सामना मुंबई येथील वानखेडे स्टेडिअमवर (Wankhede Stadium) रंगणार आहे. तर चेन्नई सुपर किंग्स संघाने यापूर्वी आयपीएलमध्ये सुरुवातीच्या तीन सामन्यामध्ये शानदार विजय मिळवला आहे. तर मुंबई इंडियन्सला गेल्या सामन्यात पंजाब विरुद्ध पराभव स्विकारावा लागला आहे. तसेच मुंबईच्या संघाने तीन सामन्यापैकी फक्त एका सामन्यात यश मिळवले असून दोन सामन्यात पराभव स्विकारावा लागला आहे.

चेन्नई सुपर किंग्सचा संघ यंदाच्या सीझनमध्ये उत्तम प्रकारे खेळत आहे. गेल्या सामन्यात संघाचा कर्णधार महेंद्र सिंग धोनी ह्याने शानदार खेळी करत संघाला संकटातून बाहेर काढत जिंकून दिले. फलंदाजीसाठी संघात शेन वॅटसन, सुरेश रैना, केदार जाधव आणि अंबाती रायडू यांच्यासारखे अनुभवी आणि सामन्या दरम्यान महत्वाची भुमिका पार पाडणारे खेळाडू आहेत.

तर आज होणाऱ्या सामन्यात धोनी संघात बदल करण्याची शक्यता कमी आहे. संघात सामन्यासाठी गोलंदाजीसाठी ड्वेन ब्रावो, वॅटसन ह्याचा अनुभव आणि स्पिन गोलंदाज जडेजा खेळणार असल्याचे नक्की आहे. गेल्या सामन्यात धोनीने हरभजन सिंह ह्याला संधी न देता मिशेल सैंटनर ह्याला खेळण्याची संधी दिली होती.(हेही वाचा-MI vs CSK, IPL 2019: चेन्नई सुपर किंग्स विरुद्धच्या महत्वाच्या सामन्यासाठी मुंबई इंडियन्सला मोठा धक्का, संघातील वेगवान गोलंदाजपटू लसिथ मलिंगा मायदेशी परतला)

तसेच मुंबई संघाबद्दल बोलायचे झाले तर, संघात एकात्मकता दिसून येत नाही आहे. फलंदाजीसाठी दक्षिण आफ्रिका संघातील क्विंटन डी कॉक ह्याने उत्तम खेळी केली आहे. तर रोहित शर्मा, केरन पोलार्ड ह्यांची फलंदाजी उत्तम राहिली नाही,. या सामन्यासाठी संघाकडे आता नवीन खेळाडू अल्जारी जोसेफ याचा समावेश असणार आहे. त्याचसोबत लसिथ मलिंगा ह्याच्या जागी बेन कटिंग ह्याला संधी देण्यात येण्याची शक्यता आहे.

 संघातील संभावित खेळाडू:

चेन्नई सुपर किंग्स संघ: अंबाती रायडू, शेन वॅटसन, सुरेश रैना, महेंद्र सिंग धोनी (कर्णधार आणि विकेटकिपर), केदार जाधव, रवींद्र जडेजा, ड्वायन ब्रावो, दीपक चहर, शार्दुल ठाकुर, हरभजन सिंह, इमरान ताहिर, मुरली विजय, ध्रुव शौरे, फाफ डु प्लेसिस, ऋतुराज गायकवाड, मिशेल सैंटनर, डेविड विली, सॅम बिलिंग्स, समीर, मोनू कुमार, कर्ण शर्मा, केएम आसिफ, मोहित शर्मा.

मुंबई इंडियन्स संघ: रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पांड्या, युवराज सिंह, क्रुणाल पांड्या, ईशान किशन (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव, मयंक मारकंडे, राहुल चहर, अनूकुल रॉय, सिद्धेश लाड, आदित्य तारे, क्विंटन डी कॉक, एविन लुइस, केरन पोलार्ड, बेन कटिंग, मिशेल मैकक्लेनेघन, एडम मिल्ने, जेसन बेहरेनडॉर्फ, अनमोलप्रीत सिंह, बरिंदर सरण, पंकज जायसवाल, रसिख सलाम, जसप्रीत बुमराह.