MI vs CSK, IPL 2019: चेन्नई सुपर किंग्स विरुद्धच्या महत्वाच्या सामन्यासाठी मुंबई इंडियन्सला मोठा धक्का, संघातील वेगवान गोलंदाजपटू लसिथ मलिंगा मायदेशी परतला
लसिथ मलिंगा (फोटो सौजन्य-PTI)

MI vs CSK, IPL 2019: इंडियन प्रीमियर लीग (IPL) मध्ये आज (3 एप्रिल) गेल्या वर्षीचा विजेता चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) विरुद्ध मुंबई इंडियन्सचा (Mumbai Indians) महत्वाचा सामना रंगणार आहे. परंतु सामना सुरु होण्यापूर्वी मुंबई इंडियन्सला मोठा धक्का बसला आहे. मीडिया रिपोर्ट्नुसार, श्रीलंका संघातील अनुभवी वेगवान गोलंदाज लसिथ मलिंगा (Lasith Malinga) आज या सामन्यात खेळताना दिसून येणार नसून त्याला मायदेशी बोलावण्यात आले आहे.

मायदेशात एक दिवशीय क्रिकेटच्या सामन्यासाठी मलिंगा परतला आहे. याबद्दल श्रीलंका क्रिकेट बोर्डाकडून पुष्टी करण्यात आली आहे. श्रीलंका क्रिकेट बोर्ड वर्ल्डकप यांनी येत्या 4 ते 11 एप्रिल पर्यंत सुपर प्रोविंशियल वनडे टूर्नामेंटचे आयोजन करण्यात आले आहे. ज्यामध्ये श्रीलंका येथील चार संघ सहभागी होणार आहेत. या टूर्नामेंटला वर्ल्डकप पूर्वी ट्रायल रुपाने खेळवण्यात येणार आहे. तसेच मलिंगा हा टूर्नामेंटमध्ये संघाचा कर्णधार म्हणून सर्व सूत्र सांभाळणार आहे.(हेही वाचा-IPL 2019 Full Schedule: 23 मार्च ते 5 मे दरम्यान रंगणार्‍या VIVO IPL 12 चे वेळापत्रक PDF स्वरूपात पहा आणि डाऊनलोड करा; जाणून घ्या कधी, कुठे रंगणार आयपीएलचे सामने)

असे सांगितले जात आहे की, लसिथ मलिंगा ह्याच्या मायदेशी परतण्यामुळे आता संघात ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज जेसन बेहरेनडोर्फ ह्याला संधी देण्यात आली आहे. बेहरेनडोर्फने नुकताच युएईमध्ये पाकिस्तान विरुद्ध 5 एकदिवशीय सामने खेळून परतला आहे.