सचिन तेंडुलकर (Photo Credit: Twitter)

महाराष्ट्र (Maharashtra) राज्याच्या 60 व्या वर्धापन दिनानिमित्त मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) याने मराठमोळ्या अंदाजात जनतेला शुभेच्छा दिल्या. 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र आणि गुजरात या राज्यांची निर्मिती झाली. संयुक्त महाराष्ट्र चळवळीनंतर 01 मे रोजी महाराष्ट्र आणि गुजरात ही दोन राज्ये स्थापन करण्यात आले.  याला आज 60 वर्षे पूर्ण होत आहेत. दरवर्षी राज्यभरात महाराष्ट्र दिन अत्यंत उत्साहात साजरा केला जातो. मात्र, यंदा कोरोना व्हायरसच्या (Coronavirus) सावटामुळे राज्यभरात महाराष्ट्र दिन अत्यंत साधेपणाने साजरा केला जाणार आहे. महाराष्ट्र दिनी दादरच्या शिवाजी पार्कवर होणारा शासकीय सोहळाही यंदा लॉकडाउनमुळे रद्द करण्यात आला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या उपस्थितीत मंत्रालयात ध्वजारोहण केलं. यापूर्वी, मुख्यमंत्र्यांनी हुतात्मा स्मारक इथे जाऊन संयुक्त महाराष्ट्र लढ्यातल्या हुतात्म्यांना वंदन केले. यंदा कोरोना व्हायरसच्या प्रसारामुळे अनेक सामाजिक आणि राजकीय कार्यक्रम रद्द करण्यात आले आहे. (महाराष्ट्र दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'जय महाराष्ट्र' म्हणत मराठीतून दिल्या कामगार दिनाच्या शुभेच्छा, पाहा ट्विट)

"आपल्या सर्वांना महाराष्ट्र दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा! जय महाराष्ट्र!," सचिनने ट्विटरवर पोस्ट शेअर केली. या पोस्टमध्ये सचिनने फेटा घातलेला आपला फोटोही शेअर केला. यापूर्वी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी राज्यातील जनतेला मराठीत ट्विट करून महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या. 1 मे हा दिवस जगभरात कामगार दिन म्हणूनही पाळला जातो.

पाहा सचिनचे ट्विट:

दरम्यान, राज्याने 10 हजार कोरोनाग्रस्तांचा आकडा पार केला आहे. गुरुवारी, महाराष्ट्रात कोरोनाचे 583 नवीन रुग्ण आढळून आले, ज्यामुळे राज्यातील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा 10, 498 वर पोहचला आहे. यामध्ये मुंबईत सर्वाधी 7061 रुग्णांचा समावेश आहे. आजवर शहरातील 290 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.दुसरीकडे, मुंबईच्या तुलनेत पुण्यात कोरोना रुग्णांची संख्या कमी असली तरी मृत्यूदर हा चिंतेचा विषय बनला आहे.