Lok Sabha Elections 2019: माजी भारतीय क्रिकेट कर्णधार राहुल द्रविड यंदा लोकसभा निवडणुकीसाठी मतदान करु शकणार नाही, हे आहे कारण
राहुल द्रविड (फोटो सौजन्य-ट्वीटर)

Lok Sabha Elections 2019: माजी भारतीय क्रिकेट कर्णधार आणि इंडिया-ए आणि अंडर-19 टीमचा प्रशिक्षक राहुल द्रविड (Rahul Dravid) यंदाच्या लोकसभा निवडणुकीत मतदान करु शकणार नाही. तर येत्या 18 एप्रिलला होणाऱ्या मतदानाचा हक्क राहुल द्रविड बजावू शकत नाही. कारण मतदान यादीमध्ये राहुल द्रविड याचे नाव नसल्याने तो मतदान करु शकणार नाही आहे.

बेंगळूरु नगर निगमचे अधिकारी एल सुरेश यांनी असे म्हटले आहे की, द्रविड ह्याने पूर्व उपनगर येथून आई-वडिलांच्या घरातून दुसरीकडे स्थलांतर केल्यानंतर मतदान यादीमध्ये नाव नोंदवले नसल्याचे सांगितले आहे. तर मतदान यादीमध्ये नाव नोंदणी करण्याची तारीख 15 मार्च होती. द्रविड मे 2018 मध्ये कर्नाटक विधानसभा मतदानासाठी मतदारांना आकर्षित करण्यासाठी निवडणुक आयोगाचा अॅम्बेसेडर होता.(हेही वाचा-Lok Sabha Elections 2019: माजी क्रिकेटर गौतम गंभीर याचा 'भाजप'मध्ये प्रवेश)

द्रविड ह्याचे नाव गेल्या मतदान केंद्राच्या (बेंगलोर सेंट्रल) मधून हटवण्यात आले होते. कारण दुसऱ्या ठिकाणी राहण्यासाठी मतदार यादीमधून नाव हटवण्यात आले होते. तसेच सुरेश यांनी असे सांगितले की, द्रविह हा काही काळापासून विदेशात आणि शहराबाहेर होता. तर 1 जानेवारी 2019 पूर्वी फॉर्म-6 भरला नव्हता. त्यानंतर 16 मार्च रोजी मतदारांची शेवटची यादी जाहीर करण्यात आली. त्यावेळी राहुल हा स्पेन मध्ये होता.