File Image of Virat Kohli (Photo Credits: IANS)

IPL 2019: किंग्स इलेव्हन पंजाब (KXIP) आणि रॉयल चैलेंजर्स बेंगलोर (RCB) यांचा शनिवारी रात्री सामना पंजाब येथील आय. एस. बिंद्रा स्टेडिअमवर (IS Bindra Stadium) खेळवण्यात आला. मात्र सामन्यादरम्यान षटकांचा वेग संथ राखल्यामुळे कोहलीवर कारवाई करण्यात आली आहे. यामुळे विराट ह्याला 12 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.

बेंगलोर संघाकडून प्रथमच आयपीएल सामन्यादरम्यान नियमांचे उल्लंघन करण्यात आले आहे. तर षटकांचा वेग संथ राखल्यामुळे आयपीएलकडून कारवाई करण्यात आली असून करवाईला समोरे जाणारा कोहली हा तिसरा कर्णधार ठरला आहे. यापूर्वी रोहित शर्मा आणि अजिंक्य रहाणे यांच्यावर कारवाई करण्यात आली होती. तर आता पुढील सामन्यात पुन्हा चुक झाल्यास एका सामन्यात खेळण्यासाठी बंदी घालण्यात येईल असे आयपीएलकडून सांगण्यात आले आहे. त्याचसोबत 24 लाख रुपये दंड आणि प्रत्येक खेळाडूच्या मॅच फीमधून 25 टक्के रक्कम दंड म्हणून वसूल करण्यात येणार आहे.(हेही वाचा-एनर्जी ड्रिंकची जाहिरात करुन फसला विराट कोहली, नेटकऱ्यांनी सुनावले)

कर्णधाराकडून तिसऱ्यांदा चुक झाल्यास त्याच्यावर एका सामन्याच्या बंदी सह 30 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात येईल. तसेच गेल्या काही दिवसांपासून नेटकऱ्यांकडून ही विराट कोहली ह्याच्यावर टीका करण्यात येत आहे.