रॉयल चॅलेंजर्स बैंगलोर (RCB) संघाचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) ला सध्या आयपीएल (IPL) मध्ये पराभवाला सामोरे जावे लागत आहे. तसेच अर्ध्यापेक्षा जास्त क्रिकेट सामने झाले असूनही कोहलीला विजय मिळाला नसल्याचे दिसून आले आहे. तर येत्या शनिवारी (12 एप्रिलला) विराट कोहलीच्या संघाचा सामना किंग्स इलेव्हन पंजाब संघासोबत असणार आहे.
परंतु सामन्यापूर्वी कोहली ह्याने एका एनर्जी ड्रिंकची जाहीरात केली. मात्र नेटकऱ्यांनी त्याला या जाहिरातीवरुन सुनावले आहे. आरसीबीचा संघ सर्व क्रिकेट संघाच्या शेवटच्या स्थानकावर आहे. तर नुकताच विराट कोहलीने जाहिरात केलेल्या एनर्जी ड्रिंकचा फोटो पोस्ट केला आहे. तर कॅप्शनमध्ये नेहमीच उत्तेजित रहा असे म्हटले आहे. परंतु नेटकऱ्यांनी त्याला या फोटोवरुन विविध प्रकारे प्रतिक्रिया देऊन त्याला सुनावले आहे. एका युजर्सने असे म्हटले आहे की, तुझा संघ यंदाच्या आयपीएलमध्ये एक ही सामना जिंकणार नाही. तु त्याची काळजी करु नकोस.(हेही वाचा-'कॅप्टन कूल' महेंद्रसिंग धोनीचा पारा चढला; राजस्थान रॉयल्स विरूद्धच्या अटीतटीच्या सामन्यात 'No Ball' च्या निर्णयावर वाद (Watch Video)
मात्र विराट कोहली ह्याने व्यक्तिगत प्रदर्शन बद्दल बोलायचे झाल्यास शानदार फलंदाजी करत खेळी केली आहे. तर संघाला जिंकवून देण्यासाठी विराट ह्याने वेळोवेळी महत्वाची भुमिका पार पाडली आहे.