Koffee With Karan च्या वादावर केएल राहुलने सोडले मौन, हार्दिक पंड्या सह मैत्रीवर केले हे मोठे विधान
Hardik Pandya, Karan Johar & K. L. Rahul (Photo Credits: Instagram)

करण जोहर (Karan Johar) याच्या शो 'कॉफी विथ करण' (Koffee With Karan) शोच्या वादावरून भारतीय क्रिकेट संघाचा स्टार क्रिकेटर केएल राहुल (KL Rahul) याने आपले मौन तोडले आहे. राहुल याने पुन्हा एकदा त्या कठीण दिवसांची आठवण करत सांगितले की त्यानंतर त्याच्यात काय बदल आले आहेत. यासह राहुलने अष्टपैलू हार्दिक पांड्या (Hardik Pandya) याच्यासह असलेल्या संबंधांवरही स्पष्टीकरण दिले. बॉम्बे टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत राहुलने या संपूर्ण वादावर उघडपणे भाष्य केले. मागील वर्षी हार्दिक आणि राहुलने महिलांविरूद्ध टिप्पण्या केल्या होत्या. याचा त्यांना त्रास देखील सहन करावा लागला. 'कॉफी विथ करण'च्या एका एपिसोडदरम्यान हार्दिकच्या महिलांविरुद्ध कमेंटवर जोरदार टीका झाली होती आणि त्यांच्यवर 'सेक्सिस्ट' असे लेबल लावले गेले होते. (11 Years of Virat Kohli: 11 वर्ष आधी झाली होती विराट कोहलीची टीम इंडियामध्ये एन्ट्री, शेअर केली ही भावनिक पोस्ट)

कॉफी विथ करणमधील तो एपिसोड प्रसारित झाल्याने त्यांचे जीवन कसे बदलले हे राहुलने या मुलाखतीत सांगितले. या संपूर्ण वादामुळे तो हादरलाच, असे राहुलने सांगितले. या घटनेनंतर तो खूप संतापला होता. पण नंतर त्याला समजले की काही गोष्टी अतिशय संवेदनशील असतात. मग आपण काहीही केले तरीही काही लोक आपल्यात वाईट दिसतात. यासह राहुल म्हणाला की, घटनेने मला जाणवून दिले की आपणास आपल्या जवळ घडणाऱ्या घटनांची माहिती असावी. आता मला क्रिकेटवर अधिक लक्ष केंद्रित करावं लागेल, कारण मी आत्ता हेच करू शकतो. याशिवाय दुसरे काहीच नाही. अशा परिस्थितीत मला माझे सर्व काही याच्यावरच द्यावे लागेल. मी त्याच दिशेने आहे. माझ्याकडे प्लान B नाही. मी आता 27 वर्षांचा आहे.

याशिवाय त्याने हार्दिकसोबत त्याच्या मैत्रीविषयी देखी स्पष्टीकरण दिले. राहुल म्हणाला, "या घटनेनंतर आमच्या दोघांवरही खूप कठीण काळ आला. जेव्हा याच्यावर तपास चालू होता, तेव्हा आम्ही एकमेकांशी बोललो. तो त्याच्या कुटुंबासमवेत होता आणि मी माझ्या. त्या परिस्थितीतून आम्ही बरेच काही शिकलो. पण, आता आम्ही एक चांगला मित्र म्हणून एकत्र आलो. हार्दिक अजूनही माझा एक चांगला मित्र आहे."