11 Years of Virat Kohli: 11 वर्ष आधी झाली होती विराट कोहलीची टीम इंडियामध्ये एन्ट्री, शेअर केली ही भावनिक पोस्ट
विराट कोहली (Photo Credit: @BCCI/Twitter)

टीम इंडियाचा कर्णधार आणि क्रिकेट विश्वात रन मशीन म्हणून ओळख असलेल्या विराट कोहली (Virat Kohli) याच्या नावावर अनेक विक्रमांची नोंद आहे. कोहली, जगातील सर्वोत्कृष्ट क्रिकेटपटूंपैकी एक मानला जातो. विराटसाठी 18 ऑगस्ट हा दिवस हा अत्यंत महत्वपूर्ण आहे. काल म्हणजे 11 वर्षांपूर्वी, 18 ऑगस्ट 2008, रोजी त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. 2008 मध्ये श्रीलंका विरुद्ध झालेल्या टेस्ट सामन्यात विराटने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. श्रीलंकाविरुद्ध झालेल्या या सामन्यात विराटने माजी सलामीवीर गौतम गंभीर सोबत फलंदाजी केली होते. पण, आता क्रिकेटमधील अनेक विक्रमांना गवसणी घालणाऱ्या विराटला पहिल्या सामन्यात केवळ 12 धावा करायाला जमल्या होत्या. (वेस्ट इंडिजच्या दौऱ्यावर असलेल्या भारतीय संघावर आतंकवादी हल्ला होण्याची शक्यता; पाकिस्तानी मिडीयाचा दावा)

दरम्यान, आपल्या आंतरराष्ट्रीय दिवसाची आठवण काढत विराटने त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर खास पोस्ट शेअर केली. यामध्ये विराटने त्याचा 2008 मधील एक फोटो आणि सध्याचा एक सेल्फी शेअर केलाय. ही पोस्ट शेअर करताना कोहलीने लिहिले, "2008 मध्ये त्याच दिवशी तरुणावस्थेपासून सुरुवात करत 2019 च्या या आजच्या दिवशीच्या 11 वर्षानंतरच्या प्रवासाचा विचार केलं, देवाने मला दिलेल्या आशीर्वादांचा मी स्वप्नातही विचार करु शकत नाही. आपल्या सर्वांना आपल्या स्वप्नांचे अनुसरण करण्याची शक्ती आणि सामर्थ्य मिळावे आणि नेहमीच योग्य मार्गाचे अनुसरण करा."

आपल्या पहिल्या सामन्यात केवळ 12 धावांवर बाद झालेला विराटने आज आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 20,000 धावांचा टप्पा ओलांडला आहे. शिवाय, आज कोहलीच्या नावावर तब्बल 43 शतक आहेत. विराटच्या नावावर वनडेमध्ये 11 हजार 520 धावा, टेस्टमध्ये 6 हजार 613 धावा आणि टी-20 मध्ये 369 धावा आहेत. मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकरयाच्या 49 वनडे शतकांच्या विक्रमांच्या जवळ कोणताही क्रिकेटपटू आहे तर तो विराट आहे.