दक्षिण आफ्रिका (South Africa) विरुद्ध टीम इंडियाच्या 3 सामन्यांच्या टेस्ट मालिकेपूर्वी वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) याला दुखापतीमुळे संपूर्ण मालिकेला मुकावे लावणार आहे. बुमराहच्या कंबरेला फ्रॅक्चर झाल्यामुळे बुमराह ही मालिका खेळू शकणार नाही. बुमराहच्याऐवजी टीममध्ये उमेश यादव ची निवड करण्यात आली आहे. 2 ऑक्टोबरपासून 3 साम्यांच्या टेस्ट मालिकेला सुरुवात होणार आहे. यानंतर, बुमराहने ट्विटरद्वारे जोरदार पुनरागमन करण्याचे चाहत्यांना आश्वासन दिले. पण, सूत्रांनुसार बुमराह डिसेंबरपर्यंत संघात परंतु शकत नाही. (IND vs SA Test Series 2019: दुखापतीने टीम इंडियातून बाहेर झालेल्या जसप्रीत बुमराह ने केले 'हे' Tweet, चाहत्यांना दिला खास मेसेज)
सूत्रांनी आयएएनएसला सांगितले: “तुम्ही म्हणू शकता की वेस्ट इंडीजविरुद्ध मर्यादित षटकांच्या मालिकेत संघ त्यांच्या पुनरागमनची अपेक्षा करीत आहे. त्यांच्या दुखापतीबाबत काही शिथिलता घेणार नसल्याचे संघ व्यवस्थापनाने स्पष्ट केले आहे. बुमराहवर नियमितपाने उपचार केले जातील आणि पूर्ण तंदुरुस्त झाल्यानंतरच तो संघात परत येईल. बांग्लादेश (Bangladesh) मालिका त्याच्यासाठी खूप लवकर होईल." याचा अर्थ असा होतो की, यावर्षी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये भारताच्या मोहिमेमध्ये बुमराहला कोणतीही भूमिका बजावत येणार नाही. आगामी टी-20 विश्वचषक लक्षात घेत संघ दक्षिण आफ्रिकाविरुद्ध 3 टेस्ट आणि नंतर बांग्लादेशविरुद्ध 2 टेस्ट मालिका खेळेल.
बुमराहच्या दुखापतीविषयी माहिती देताना असे म्हणतात की नितीन पटेल यांच्याकडे त्यांचे लक्ष लागून राहिले आहे. “जर एखाद्या व्यक्तीला बुमराहच्या दुखापतीबद्दल पूर्ण माहिती असेल तर तो नितीन आहे. तो वेळेआधी पुनरागमनदेखील करू शकतो." दुसरीकडे, वेस्ट इंडिजविरुद्ध कसोटी मालिकेनंतर कर्णधार विराट कोहली ने वर्कलोडवर काळजी व्यक्त केली होती. विराट म्हणाला होता की, खेळाडूंचा वर्क लोडबाबत व्यवस्था करणे त्यांच्यासाठी सध्या महत्वाचे आहे. आणि या कारणास्तव, बुमराह विश्वचषकनंतर मर्यादित ओव्हर्समध्ये फारच कमी खेळला आहे. टेस्ट खेळण्यापूर्वी तो फ्रेश असावा अशी संघ व्यवस्थापनाची इच्छा आहे.