IND vs SA Test Series 2019: दुखापतीने टीम इंडियातून बाहेर झालेल्या जसप्रीत बुमराह ने केले 'हे' Tweet, चाहत्यांना दिला खास मेसेज
जसप्रीत बुमराह (Photo Credit: IANS)

दक्षिण आफ्रिकाविरुद्ध टेस्ट मालिकेआधी टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे. वेंगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह याला दुखापतीमुळे संपूर्ण मालिकेला मुकावे लावणार आहे. बुमराहच्या कंबरेला फ्रॅक्चर झाल्यामुळे बुमराह ही मालिका खेळू शकणार नाही. बुमराहच्याऐवजी टीममध्ये उमेश यादव ची निवड करण्यात आली आहे. बीसीसीआयने ट्विटरद्वारे याबाबत माहिती दिली. 2 ऑक्टोबरपासून 3 साम्यांच्या टेस्ट मालिकेला सुरुवात होणार आहे. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातली पहिली टेस्ट 2 ऑक्टोबरला विशाखापट्टणममध्ये, दुसरी रांचीमध्ये आणि तिसरी पुण्यात खेळवली जाणार आहे. हे तिन्ही सामने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा भाग असतील. दरम्यान, दुखापतीने टीम इंडियातून बाहेर पडलेल्या बुमराह आज ट्विटरद्वारे चाहत्यांसाठी एक खास मेसेज शेअर केला. (IND vs SA Test 2019: टीम इंडियाच्या दक्षिण आफ्रिकाविरुद्ध टेस्ट मालिकेतून जसप्रीत बुमराह Out, 'या' गोलंदाजाला मिळाली संधी)

बुमराहने आपल्या चाहत्यांना आश्वासन दिले आहे की या नुकसानाची भरपाई करण्यासाठी तो अधिक सामर्थ्याने मैदानावर परत येईल. बुमराहच्या दुखापतीची बातमी समजल्यानंतर सोशल मीडियावर  त्याच्या चाहत्यांनी त्याला लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या. याबाबत ट्विट करून बुमराहने कृतज्ञता व्यक्त केली. बुमराहने लिहिले, 'जखमी होणे हा खेळाचा एक भाग आहे. मी लवकर फिट होण्यासाठी शुभेच्छा दिल्याबद्दल सर्वांचे आभार. आता या नुकसानीची भरपाई करण्यासाठी मी आणखी मजबूत पुनरागमन करण्याची तयारी करत आहे.' यानंतर बुमराहच्या दुखापतीवर एनसीए मध्ये उपचार केले जातील आणि बीसीसीआयच्या वैद्यकीय पथकाच्या देखरेखीखाली असेल.

बुमराहच्या नियमित रेडिओलॉजिकल स्क्रीनिंग दरम्यान त्याच्या मागील भागाला किरकोळ दुखापत झाल्याची माहिती बीसीसीआयने दिली होती. बुमराहने वेस्ट इंडिजविरुद्ध टेस्ट मालिकेत उत्कृष्ट कामगिरी केली होती. बुमराहने टेस्टमध्ये सर्वात जलद 50 विकेट घेण्याचा विक्रम केला होता.