IND vs SA Test 2019: टीम इंडियाच्या दक्षिण आफ्रिकाविरुद्ध टेस्ट मालिकेतून जसप्रीत बुमराह Out, 'या' गोलंदाजाला मिळाली संधी
जसप्रीत बुमराह (Photo Credits: Getty Images)

जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) याला दक्षिण आफ्रिके (South Africa) विरुद्ध कसोटी मालिकेतून बाहेर करण्यात आले आहे. त्याच्या जागी अनुभवी उमेश यादव (Umesh Yadav) याचा कसोटी संघात समावेश करण्यात आला आहे. बीसीसीआयने याबाबत ट्विटरद्वारे माहिती दिली. 2 ऑक्टोबरपासून कसोटी मालिका सुरू होणार आहे. बुमराह टी-20 मालिकेसाठी भारतीय संघाचा भाग नव्हता. भारतीय संघाला (Indian Team) दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 3 कसोटी सामने खेळायचे आहेत. भारत आणि दक्षिण आफ्रिका संघातील टेस्ट मालिकेला 2 ऑक्टोबरपासून सुरुवात होणार आहे. बुमराह कसोटी मालिकेच्या तयारीसाठी बंगळुरूमध्ये होता. बुमराह सराव करतानाही दिसला होता, पण अचानक बुमराहला कमरेच्या खालच्या बाजूला दुखणं सुरु झाले ज्यामुळे त्याला कसोटी मालिकेतून बाहेर पडावे लागले. (रिषभ पंत च्या फलंदाजीवर सतत उपस्थित केल्या जाणाऱ्या प्रश्नांवर युवराज सिंह चा टीम इंडियावर हल्ला बोल)

बुमराह एक अनोखी प्रतिभा आहे आणि त्याच्या वेगळी कृती त्याला कमकुवतपणा नव्हे तर मजबूत बनवते. बीसीसीआयने दिलेल्या अधिकृत निवेदनानुसार बुमराहच्या पाठीवर स्लो स्ट्रेस फ्रॅक्चर आहे. नियमित रेडिओलॉजिकलदरम्यान ही जखम आढळली. बंगळुरू येथील नॅशनल क्रिकेट अ‍ॅकॅडमी येथे बीसीसीआयच्या वैद्यकीय पथकाच्या देखरेखीखाली बुमराह आता पुनर्वसन प्रक्रिया पार पाडणार आहे. आफ्रिका संघाविरुद्ध टेस्ट मालिकेआधी टीम इंडियासाठी हा मोठा धक्का मानले जात आहे. बुमराहने नुकतेच वेस्ट इंडिज दौर्‍यावर अप्रतिम कामगिरी केली होती. कसोटी मालिकेदरम्यान त्याने सर्वात वेगवान 50 विकेट्स नोंदवले होते.

दक्षिण आफ्रिकाविरुद्ध मालिकेसाठी भारतीय संघ: 

विराट कोहली (कॅप्टन), अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), रोहित शर्मा, मयंक अग्रवाल, चेतेश्वर पुजारा, हनुमा विहारी, रिषभ पंत (विकेटकीपर), रिद्धिमान सहा, रविचंद्रन, अश्विन, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, उमेश यादव, इशांत शर्मा आणि शुभमन गिल.