इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) येत्या 26 मार्चपासून चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स सामन्याने सुरू होणार आहे. 70 लीग स्टेज सामने महाराष्ट्रात (Maharashtra) चार ठिकाणी खेळले जातील. त्यापैकी 55 सामने मुंबईच्या (Mumbai) तीन ठिकाणी, तर 15 सामने पुणे (Pune) येथे खेळले जातील. आयपीएलचा संपूर्ण हंगाम उष्ण आणि दमट वातावरणात खेळला जात असल्याने - आयपीएल 2022 ची खेळपट्टी नक्की फलंदाज-गोलंदाजांपैकी कोणासाठी फायदेशीर ठरेल याबाबत खेळाडू तसेच चाहत्यांमध्येही मोठी उत्सुकता आहे. मुंबईच्या मैदानात वेगवान गोलंदाजांना थोडीफार मदत मिळणार असली तरी पुण्यात फिरकीपटूच राज्य करू शकतात. मुंबईच्या खेळपट्टीवर लाल माती वापरली जाईल, तर पुण्यातील MCA स्टेडियमवर काळ्या मातीचा वापर केला जाईल. IPL मधील सर्व मैदानावरील खेळपट्टीचा अहवाल जाणून घ्या. (ICC Women's World Cup 2022: महिला विश्वचषक सामन्यांमध्ये आता 100 टक्के प्रेक्षकांना मिळणार एन्ट्री, ICC ने क्रिकेट चाहत्यांना दिली खुशखबर)
वानखेडे स्टेडियम: या मैदानावर आक्रमक फलंदाज आणि वेगवान आणि/किंवा स्विंग गोलंदाजांनी वर्चस्व गाजवण्याची अपेक्षा केली जाऊ शकते. वानखेडे हे पारंपारिकपणे धावांचा पाठलाग करणारे मैदान आहे ज्यामध्ये संघ दव वापरून धावांचा पाठलाग करतात. या मैदानावरील शेवटच्या 13 सामन्यांपैकी फक्त तीन सामने प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघांनी जिंकले आहेत, गेल्या 20 सामन्यांमधील पहिल्या डावातील धावसंख्या 175 आहे.
ब्रेबॉर्न स्टेडियम: या मैदानावर स्पर्धात्मक टी-20 सामन्याचे आयोजन होऊन बराच काळ लोटला आहे, परंतु वानखेडेप्रमाणेच हे देखील मोठ्या धावसंख्येचा मैदान आहे. वानखेडे प्रमाणेच या खेळपट्टीचा वैशिष्ट्य देखील असले पाहिजे, म्हणजे वेगवान गोलंदाज पुन्हा वर्चस्व गाजवताना दिसतील. तर इथे 170 पेक्षा जास्त धावसंख्या सर्वसामान्य असेल. पण वानखेडेपेक्षा हे मोठे मैदान आहेत हे लक्षात घेऊन फिरकीपटू अधिक खेळू शकतात.
डी.वाय.पाटील स्टेडियम: येथे आयपीएल खेळून एक दशक पेक्षा अधिक काळ उलटला असून गेल्या दोन वर्षांपासून या स्टेडियमचा फुटबॉल मैदान म्हणून वापर केला जात आहे. या खेळपट्टीचा असा कोणताही डेटा उपलब्ध नसला तरी मुंबईतील इतर ठिकाणांच्या तुलनेत मैदान खूपच मोठे असल्याने स्कोअर करण्यासाठी स्टेडियम हे सर्वात कठीण ठिकाणांपैकी एक असेल. आउटफिल्ड मात्र वेगवान असण्याची अपेक्षा आहे म्हणजे हे देखील उच्च धावसंख्येचे मैदान असेल.
एमसीए स्टेडियम, पुणे: या स्टेडियमवर गेल्या चार वर्षांत फक्त एक टी-20 सामना खेळला गेला आहे, मागील 14 पैकी नऊ सामने जिंकणाऱ्या संघांणि धावांचा पाठलाग करण्याचा पर्याय निवडला आहे. काळ्या मातीने फिरकीपटूंना काही वळण आणि उसळी घेऊन मुंबईतील ठिकाणांच्या तुलनेत अधिक मदत मिल्ने अपेक्षित आहे. येथे फिरकीपटू प्रत्येक 23 चेंडूत 6.78 च्या सरासरीने विकेट घेतात. त्यामुळे कदाचित या मैदानावर फिरकीपटूंचा प्रभाव जलद आणि महत्त्वाचा ठरेल.