IPL 2021: आयपीएलवर कोरोनाचे संकट! नितीश राणा, अक्षर पटेल यांच्यानंतर रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरच्या संघामधील 'या' खेळाडूलाही कोरोनाची लागण
RCB (Photo Credit: Twitter)

आयपीएलच्या 14व्या हंगामाला (IPL 2021)  येत्या 9 एप्रिलपासून  सुरुवात होणार असताना आयपीएलमधील अनेक खेळाडू कोरोनाच्या (Coronavirus) जाळ्यात अडकत चालले आहेत. यातच रॉयल चॅलेजर्स बेंगलोरच्या संघाचा (RCB) सलामीवीर देवदत्त पडिक्कल (Devdutt Padikkal) याची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आढळली आहे. यामुळे पडिक्कल हा सुरुवातीच्या काही सामन्यांना मुकण्याची शक्यता आहे. पडिक्कल हा कोरोनाची लागण झालेला आयपीएलमधील तिसरा खेळाडू ठरला आहे. दरम्यान, दिल्ली कॅपिटल्स संघाचा अष्टपैलू खेळाडू अक्षर पटेल याचीही कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. तर, कोलकाता नाईट राइडर्स संघाचा फलंदाज नितीश राणाने नुकतीच कोरोनावर मात केली आहे.

टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, देवदत्तला कोरोनाची बाधा झाल्याचे समजताच त्याला क्वारंटाइन ठेवण्यात आले आहे. आयपीएलच्या यंदाच्या हंगामातील पहिला सामना आरसीबी विरुद्ध मुंबई इंडियन्स यांच्यात 9 एप्रिलला खेळला जाणार आहे. त्यामुळे बलाढ्य मु्ंबईविरुद्धच्या सामन्यात देवदत्तची अनुपस्थिती संघासाठी घातक ठरण्याची शक्यता आहे. हे देखील वाचा- IPL 2021 Schedule in PDF for Free Download: इंडियन प्रीमियर लीग च्या 14 व्या सीजन मधील सामन्यांचे संपूर्ण वेळापत्रक; जाणून घ्या वेळ आणि ठिकाण

ट्विट-

कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्यामुळे बीसीसीआयकडून योग्य ती खबरदारी घेतली जात आहे. आयपीएलच्या स्पर्धा खेळवण्यासाठी 6 ठिकाण निश्चित करण्यात आली आहेत. महत्वाचे म्हणजे, ही स्पर्धा प्रेक्षकांविना खेळवली जाणार आहे. तसेच खेळाडूंसाठी बायो-बबल तयार करण्यात आले आहेत. याशिवाय, प्रत्येक संघाच्या खेळाडूंमध्ये वाढ करण्यात आली आहे, असे बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी म्हटले आहे.