IPL 2021 (Photo Credits: ANI)

बोर्ड ऑफ क्रिकेट कंट्रोल इंडियाने (Board of Control for Cricket in India ) काही दिवसांत सुरु होणाऱ्या आयपीएल 2021 (IPL 2021) चे वेळापत्रक जाहीर केले आहे. आयपीएल चा 14 (IPL Season 14) वा हंगाम हा 9 एप्रिलपासून सुरु होणार असून पहिला सामना रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (Royal Challengers Bangalore) आणि मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) मध्ये रंगणार आहे. हा सामना चेन्नईच्या चिदम्बरम स्टेडियमवर खेळवला जाईल. सीजनमधील सर्व 8 संघ एकमेकांशी दोनदा भिडतील आणि पॉईंट टेबलमधील टॉप 4 संघ प्ले ऑफसाठी पात्र ठरतील. अहमदाबाद येथे नवीनच बांधलेल्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर प्ले ऑफचे सामने आणि सीजनचा अंतिम सामना होणार आहे. आयपीएल 14 चे संपूर्ण वेळापत्रक PDF Format मध्ये डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.

सर्व चार वेगवेगळ्या मैदानांवर आयपीएलचे सामने खेळतील. परंतु, कोणताही संघ आपल्या होम ग्राऊंडवर खेळणार नाही. आयपीएलमधील 56 सामन्यांपैकी चेन्नई, मुंबई, कोलकाता आणि बंगलोर येथे प्रत्येकी 10 सामने होतील. अहमदाबाद आणि दिल्ली मध्ये प्रत्येकी 8 सामने होतील. दुपारच्या सत्रातील सामना हा दुपारी 3.30 वाजता सुरु होईल. तर संध्याकाळचा सामना 7.30 वाजता सुरु होईल. (IPL 2021 Anthem: ‘इंडिया का अपना मंत्रा’! आयपीएल 14 चे नवीन स्फूर्तिदायक अँथम रिलीज, Watch Video)

आयपीएल 2021 च्या सुरुवातीच्या सामन्यांमध्ये प्रेक्षकांना प्रवेश नाकारण्यात आला आहे. मात्र जशजशी स्पर्धा पुढे जाईल. त्यानुसार प्रेक्षकांच्या उपस्थितीवर निर्णय घेतला जाईल. मागील वर्षीचा आयपीएल सामने कोविड-19 संकटामुळे युएई मध्ये खेळवण्यात आले होते. परंतु, यावर्षी आयपीएल भारतात होत असल्याने चाहते प्रचंड उत्सुक आहेत. गतविजेते मुंबई इंडियन्सचा यंदा सहाव्यांदा आयपीएल जिंकण्याचा मानस असेल. तर यंदा चेन्नई सुपर किंग्स, रॉयल चॅलेंजर्स बंगलोर आणि दिल्ली कॅपिटल्स संघाचे पारडे देखील भारी दिसत आहे.