IPL 2021 (PC - ANI)

IPL 2021 Anthem: इंडियन प्रीमियर लीगच्या (Indian Premier League) आगामी 2021 हंगामासाठी नवीन अँथम सॉंग रिलीज करण्यात आले आहे. ‘इंडिया का अपना मंत्रा’ नावाने प्रसिद्ध करण्यात आलेले हे अँथम सॉंग एक मिनिट आणि 30 सेकंदाचे आहे. आयपीएलच्या (IPL) 14 व्या सत्राची सुरुवात गतविजेत्या मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (Royal Challengers Bangalore) यांच्यातील 09 एप्रिल रोजी होणाऱ्या सलामीच्या सामन्यातून होईल. हा पहिला सामना चेन्नईच्या (Chennai) एम.ए. चिदंबरम क्रिकेट स्टेडियमवर खेळला जाणार आहे. यंदा स्पर्धेचे सामने अहमदाबाद, बेंगलोर, चेन्नई, दिल्ली, मुंबई आणि कोलकाता येथे आयोजित केले जातील. विशेष म्हणजे कोणत्याही संघाला होम-ग्राउंडचा फायदा मिळणार नाही. आयपीएल प्ले ऑफ आणि फायनल 30 मे 2021 रोजी नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियम येथे जगातील सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियम येथे खेळले जातील. (MS Dhoni Monk Avatar: ‘कोणाचा मंत्र कामी येईल हे तर...’ एमएस धोनीच्या व्हायरल फोटोमागील रहस्य अखेर उघड, रोहित शर्माला म्हणाला लालची)

लीग टप्प्यात प्रत्येक संघ चार मैदानावर खेळेल. लीगच्या 56 सामन्यांपैकी चेन्नई, कोलकाता, मुंबई आणि बेंगलोर येथे प्रत्येकी 10 सामने तर अहमदाबादमध्ये 8 सामने खेळले जातील. ट्विटरवर “इंडिया का अपना मंत्र” अशा नवीन आयपीएल थीम सॉंगची घोषणा करण्यात आली. “#VIVOIPL 2021 अँथम भारताच्या नवीन, धाडसी आणि आत्मविश्वासाच्या भावनेला सलाम करतो. चला सर्वांनी #IndiaKaApnaMantra वर विश्वास ठेवूया. या मोसमात आपल्या आवडत्या संघाचा यशस्वी मंत्र होईल असे आपल्याला काय वाटते ते आम्हाला सांगा. #VIVOIPL 2021 - 9 एप्रिलपासून सुरू होईल!” असं या व्हिडिओला कॅप्शन देण्यात आलं आहे. या व्हिडिओत आयपीएलच्या पंजाब किंग्जचा केएल राहुल, कोलकाता नाइट रायडर्सचा शुभमन गिल, दिल्ली कॅपिटल्सचा रिषभ पंत आदी खेळाडू आहेत. रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचा कर्णधार विराट कोहली आणि मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा आकाशाकडे लक्ष वेधून देत आयपीएल 2021 च्या थीम सॉंगचे समर्पण होते.

आयपीएलचा थरार सुरु होण्यासाठी आता अवघे काही दिवसच शिल्लक राहिला आहे. मुंबई इंडियन्स स्पर्धेतील सर्वात यशस्वी टीम इंडिया आहे तर यंदा आरसीबी, पंजाब किंग्स, दिल्ली कॅपिटल्स आपले पहिले विजेतेपद पटकावण्याच्या उद्देशाने मैदानात उतरतील. शिवाय, यंदा चेन्नई सुपर किंग्सकडूनही चांगल्या कामगिरीची अपेक्षा केली जात असेल. मागील वर्ष संघ पहिल्यांदा प्ले ऑफ गाठण्यात अपयशी ठरला होता.