IPL 2020 Update: UAE मध्ये आयपीएल खेळवण्यावर BCCI समोर नवीन आव्हाने; WAGS, स्थानिक ड्रायव्हर्स, सुरक्षितता असे बरेच प्रश्न अद्याप निरुत्तर
रोहित शर्मा-एमएस धोनी (Photo Credit: Getty)

बीसीसीआय (BCCI) युएईमध्ये आयपीएलच्या आठ फ्रँचायझी (IPL Franchise) संदर्भात तपशीलवार प्रमाणित कार्यप्रणाली देईल, पण येत्या काही दिवसांत सर्व संबंधित प्रश्नांची उत्तरे सर्व संबंधित संस्थांना अपेक्षित आहेत. सर्व फ्रॅन्चायझी त्यांच्या स्पेशलिटी टीम अमिरातीला पाठवण्यास सुरवात करतील जेणेकरुन ते सुविधांचा आढावा घेतला जाईल आणि कोणत्या प्रकारचे जैव सुरक्षित वातावरण तयार केले जाऊ शकते हे शोधू शकेल असे PTIने आपल्या अहवालात म्हटले आहे. इंडियन प्रीमियर लीगच्या (Indian Premier League) 13 वा सत्र संयुक्त अरब अमिराती (UAE) मध्ये 26 सप्टेंबरपासून होणार आहे. पण, त्यापूर्वी स्थायी कार्यप्रणाली (SOP) बाबत बोर्डाला काही प्रश्नांची उत्तरे द्यावी लागतील. पहिला प्रश्न खेळाडूंच्या कुटुंबाचा आहे. एका फ्रँचायझीच्या उच्च अधिकाऱ्याने सांगितले की खेळाडूंना दोन महिने त्यांच्या पत्नी किंवा कुटूंबापासून दूर ठेवणे चुकीचे आहे. ते म्हणाले, 'पत्नी किंवा मैत्रिणी सामान्य वेळी खेळाडूंबरोबर येऊ शकतात परंतु आता परिस्थिती वेगळी आहे. जर कुटुंबही त्याच्याबरोबर गेले तर तो हॉटेलच्या खोलीतच राहू शकेल किंवा सामान्यपणे येऊ-जाऊ शकेल.’ (IPL 2020 Update: UAE मधील इंडियन प्रीमियर लीग 13 दरम्यान शारजाह, दुबई व अबूधाबी स्टेडियममध्ये दर्शकांना मिळणार परवानगी? वाचा सविस्तर)

"असे खेळाडू असतील ज्यांची मुलं वय 3 ते 5 वयोगटातील असतील आणि आपण त्यांना दोन महिने खोलीत कसे ठेवू शकता," ते पुढे म्हणाले. क्रिकेट संघ सामान्यत: पंचतारांकित हॉटेलमध्येच राहतात, परंतु खेळाडूंव्यतिरिक्त इतर सामान्य पाहुणे हॉटेलमध्ये येऊ शकणार नाहीत अशा मोठ्या संख्येने व्यवस्था करणे अवघड आहे. अधिकाऱ्याने म्हटले की, "प्रत्येक संघ मुंबई इंडियन्सशी स्पर्धा करू शकत नाही. त्यांच्याकडे खासगी विमान आहे आणि ते सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमधून डॉक्टर घेऊन जाऊ शकतात.संपूर्ण पंचतारांकित हॉटेल भाड्याने घेऊ शकतात, परंतु उर्वरित लोकांना त्यांच्यासाठी काय चांगले आहे ते पहावे लागेल."

याशिवाय संघांना अमिराती क्रिकेट बोर्डासोबत मिळून स्थानिक वाहतुकीचीही व्यवस्था करावी लागेल. सहसा ड्रायव्हर्स एका दिवसाच्या कामानंतर घरी परततात, परंतु अशा परिस्थितीत त्यांना जैविक दृष्ट्या सुरक्षित वातावरणात दोन महिने रहावे लागू शकते. ब्रेक दरम्यान सामान्यतः खेळाडूंची सेवा देणार्‍या कॅटरिंग स्टाफसाठी स्वतंत्र बायो-बबल असेल का? ड्रायव्हर्स आणि सुरक्षा अधिकाऱ्यांप्रमाणेच त्यांचीही दररोज टेस्ट केली जाऊ शकते आणि त्यांनाही जैव-सुरक्षित वातावरणात देखील समाविष्ट केले जाऊ शकते.