IPL 2020 Update: UAE मधील इंडियन प्रीमियर लीग 13 दरम्यान शारजाह, दुबई व अबूधाबी स्टेडियममध्ये दर्शकांना मिळणार परवानगी? वाचा सविस्तर
अबूधाबी क्रिकेट स्टेडियमचे सामान्य दृश्य (Photo Credits: Getty Images)

इंडियन प्रीमिअर लीगचे (आयपीएल) यंदा आयोजन आणि बीसीसीआय हजार कोटींच्या नुकसानीतून काढण्यासाठी भारतीय बोर्ड आणि अमिराती क्रिकेट बोर्ड आयपीएल युएईत आयपीएल आयोजित करण्यास सज्ज आहे. 19 सप्टेंबर ते 8 नोव्हेंबर या दरम्यान भारतातील प्रसिद्ध टी-20 लीगचे आयोजन केले जाईल. भारत वाढणारी कोरोना व्हायरसची प्रकरणं तर युएईत कोरोना पॉसिटीव्ह रुग्णांची संख्या 60,000 च्या जवळ असून मृत्यू दार 340 वर आहे, त्यामुळे यंदा भारताऐवजी आखाती देशात आयपीएलचे आयोजन करण्याचे निश्चित झाले. हे सर्व सामने शारजाह, दुबई व अबूधाबी स्टेडियममध्ये खेळवले जातील. मात्र, एक प्रश अद्यापही स्पष्ट झालेला नाही आणि तो म्हणजे की या स्टेडियममध्ये प्रेक्षकांना परवानगी मिळेल की नाही? इंग्लंडविरुद्ध आयर्लंड आणि पाकिस्तानविरुद्ध सामने रिक्त स्टेडियममध्ये आयोजित करणार आहे, तर सरे आणि मिडलसेक्सच्या मैत्रीपूर्ण सामन्यात मर्यादित प्रेक्षकांना सामना पाहण्याची संधी मिळाली होती. (IPL 2020 Update: दक्षिण आफ्रिका क्रिकेटपटूंचं आयपीएलमध्ये खेळल्यावर संशय; CSK, RCB समोर मोठं टेंशन)

आयपीएलमुळे शारजाह, दुबई आणि अबुधाबी स्टेडियममध्ये चाहत्यांना परवानगी मिळण्याची शक्यता अधिक आहे. यापूर्वी अमिराती क्रिकेट बोर्डाचे (ईसीबी) सरव्यवस्थापक मुबाशीर उस्मानी यांनी आयपीएल युएईमध्ये झाल्यास प्रेक्षकांना परवानगी दिली जाऊ शकते याचे संकेत दिले होते. “स्टेडियममध्ये प्रेक्षक असणे सरकारच्या मान्यतेच्या अधीन आहे. काहीही निर्णय घेण्यापूर्वी आम्ही सविस्तर चर्चा करू. अजून वेळ आहे आणि आयपीएल येथे पार पडल्यास आम्ही यावर विचार करू," उस्मानी यांनी दुबईहून द टेलीग्राफला सांगितले.

दुसरीकडे, बीसीसीआयनेअमिराती क्रिकेट बोर्डाला आयपीएल आयोजित करण्यासाठी स्वीकृती पत्र पाठवले आहेत आणि बीपीसीआय अद्यापही आयपीएल भारताबाहेर नेण्यासाठी सरकारच्या मंजुरीची प्रतीक्षा करीत आहे. बीसीसीआय आणि ईसीबी दोघांनी संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करुन या स्पर्धेची तयारी सुरू केली आहे. युएईने यापूर्वी आयपीएल 2014 च्या काही सामन्यांचे आयोजन केले होते. तेव्हा सार्वत्रिक निवडणुकांमुळे ही स्पर्धा भारताबाहेर खेळवली गेली होती.