कोरोना व्हायरसमुळे (Coronavirus) भारतात कित्येक महिने क्रीडा स्पर्धा ठप्प झाल्या होत्या. मात्र, आता सर्व भारतीयांसाठी सकारात्मक किरण दिसत आहे, कारण इंडियन प्रीमियर लीग (IPL) संयुक्त अरब अमिरातीमध्ये (United Arab Emirates) 19 सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. युएईमध्ये (UAE) 19 सप्टेंबर ते 8 नोव्हेंबर या कालावधीत टी-20 स्पर्धेचे 13 व्या आवृत्तीचे आयोजन करण्याचा निर्णय घेतला आहे. परदेशी खेळाडूंनी आयपीएलमध्ये भाग घेण्यासाठी यापूर्वीच संबंधित मंडळांकडून ना-हरकत प्रमाणपत्र (NOC) मिळण्यास सुरुवात झाली आहे. वृत्तानुसार न्यूझीलंड क्रिकेटने सर्वप्रथम खेळाडूंना युएईकडे जाण्यासाठी परवानगी देण्यात येईल असे जाहीर केले. क्रिकेट दक्षिण आफ्रिका (Cricket South Africa) लवकरच आपल्या खेळाडूंना आयपीएलमध्ये खेळण्यासाठी एनओसी मिळवून देईल अशी घोषणा केली होती. खेळाडूंना युएईकडे पाठवण्यास तयार असले तरी आयपीएल 2020 यंदा दक्षिण आफ्रिकेच्या खेळाडूंशिवाय खेळण्याची शक्यता आहे. (IPL 2020: आयपीएलच्या सर्वात यशस्वी फ्रॅंचायझी टीमला UAEत नाही जिंकता आला एकही सामना, जाणून घ्या युएईमधील आयपीएल संघांचे रेकॉर्ड)
दक्षिण आफ्रिकेला कोरोना व्हायरसची प्रकरणे झपाट्याने वाढत सध्या भारताप्रमाणेच संघर्ष करावा लागत आहे. आफ्रिकन देश विषाणूपासून बचाव करण्यासाठी धडपड करीत असताना आफ्रिकेच्या सरकारने गेल्या काही महिन्यांपासून सर्व परदेशी उड्डाणांना प्रतिबंधित करत देशात पुन्हा लॉकडाउन लादले आहे. याचा अर्थ असा की जरी खेळाडूंना सीएसएद्वारे भाग घेण्याची परवानगी दिली गेली तरी सुद्धा सरकारने त्यांच्यावरील निर्बंध शिथिल केल्याशिवाय त्यांना देशाची सीमे सोडण्याची परवानगी दिली जाऊ शकत नाही. दरम्यान, या सर्वांचा सर्वात मोठा फटका चेन्नई सुपर किंग्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरला बसणार आहे. दोन्ही संघांच्या परदेशी तुकडीत तीन खेळाडूंचा समावेश आहे, हे सर्व मार्की खेळाडू आहेत.
आरसीबी ज्यांची फलंदाजीची ताकद एबी डिव्हिलियर्सवर जास्त अवलंबून असते, त्यांना अनुभवी क्रिकेटरची जागा घेण्यासाठी इतर पर्याय शोधण्याची सक्ती केली जाईल. दरम्यान, सीएसके त्यांच्या दोन स्ट्राइक गोलंदाजांशिवाय असेल- इमरान ताहिर आणि लुंगी एनगीडी. सध्या 13 व्या आवृत्तीसाठी दक्षिण आफ्रिकेच्या 10 खेळाडूंना आयपीएलच्या वेगवेगळ्या फ्रँचायझींनी करार केला आहे. एबी डिव्हिलियर्स (आरसीबी), क्रिस मॉरिस (आरसीबी), डेल स्टेन (आरसीबी), क्विंटन डी कॉक (मुंबई इंडियन्स), फाफ डु प्लेसिस (सीएसके), इमरान ताहिर (सीएसके), लुंगी एनगीडी (सीएसके), कगिसो रबाडा (दिल्ली) कॅपिटल), डेविड मिलर (राजस्थान रॉयल्स) आणि हार्डस विल्जॉईन (किंग्ज इलेव्हन पंजाब).