आयपीएल (Photo Credit: Getty Images)

इंडियन प्रीमियर लीगचा (Indian Premier League) 13 वा सत्र युएईमध्ये (UAE) खेळला जाईल याची भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCO) अधिकृतपणे घोषणा केली आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) कोरोना विषाणूच्या साथीमुळे यंदा ऑस्ट्रेलियामध्ये होणारा टी-20 विश्वचषक पुढे ढकलण्याचा निर्णय घेतल्यानंतर बीसीसीआयने अधिकृतपणे याची पुष्टी केली. आयपीएल यंदा पूर्वी मार्च ते मे या कालावधीत होणार होता, परंतु कोरोनामुळे पुढे ढकलण्यात आला. या वेळी आयपीएल दुबई, शारजाह आणि अबू धाबी येथे खेळला जाणार आहे. आयपीएलचा हंगाम 19 सप्टेंबरपासून सुरू होणार आहे, तर स्पर्धेचे अंतिम सामना 8 नोव्हेंबरला रंगणार आहेत. बीसीसीआय लवकरच आयपीएल गव्हर्निंग कौन्सिल (IPL Governing Council) आणि फ्रँचायझीसमवेत या स्पर्धेच्या पूर्ण वेळापत्रकात काम करणार आहे. मात्र, त्यापूर्वी युएई येथे आयपीएलच्या फार कमी संघांना चांगली कामगीरी करता आली आहे, ज्यात असा एक संघ आहे ज्याला या ठिकाणी एकही सामना जिंकता आला नाही. (IPL 2020 Update: डेविड वॉर्नर, बेन स्टोक्ससह इतर इंग्लंड-ऑस्ट्रेलियाई क्रिकेटर्स आयपीएल 13 च्या पहिल्या काही सामन्यातून असणार गायब?)

यापूर्वीही युएईमध्ये आयपीएलचे आयोजन केले गेले होते तथापि, त्यावेळी सुमारे 40% सामने युएईमध्ये खेळले जात होते, संपूर्ण स्पर्धा नव्हे. 2014 लोकसभा निवडणुकीने सुरक्षेचे भान ठेवून बीसीसीआयला परदेशी भूमीवर ही लीग आयोजित करण्यास भाग पाडले गेले होते. आयपीएलच्या सध्याच्या 8 संघांनी दुबई, शारजाह आणि अबूधाबी येथे 5-5 सामने खेळले आहेत. आश्चर्याची बाब म्हणजे आयपीएलचा सर्वात यशस्वी संघ असलेल्या मुंबई इंडियन्सने (Mumbai Indians) युएईमध्ये एकही सामना जिंकलेला नाही, तर किंग्ज इलेव्हन पंजाबने (Kings XI Punjab) युएईमधील त्यांचे सर्व सामने जिंकले आहेत.

युएईमध्ये सर्वाधिक सामने जिंकणारा संघ चेन्नई सुपर किंग्ज असून त्याने चार सामने जिंकले आहेत. तिसर्‍या क्रमांकावर राजस्थानचा संघ आहे, ज्याने 3 सामने जिंकले आहेत. कोलकाता नाइट रायडर्स, रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू, सनरायझर्स हैदराबाद आणि दिल्ली कॅपिटल्सने प्रत्येकी 2 सामने जिंकले आहेत.