ड्रीम11 आयपीएल (Photo Credit: Twitter)

आयपीएलच्या (IPL) 13व्या हंगामाच्या स्पॉन्सरशिपचे हक्क अखेरीस Dream11 या कंपनीला मिळाले आहे. ड्रीम11 ने 222 कोटींची बोली लावत हक्क विकत घेतले. 31 डिसेंबर 2020 पर्यंत बीसीसीआय आणि ड्रीम11 यांच्यातला करार कायम राहणार आहे. तथापि, यामुळे वाद देखील उद्रेक झाला आहे, ड्रीम11 कडे चिनी (China) आणि हाँगकाँग (Hong Kong) कंपनीने गुंतवणूक केली आहे. अशा परिस्थितीत भारतीय व्यापार संघटना कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सने (CAIT) तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. कॅटचे सरचिटणीस प्रवीण खंडेलवाल (Praveen Khandelwal) यांनी ट्वीट केले की, विवो कंपनीच्या जागी ड्रीम11 सह ड्रीम आयपीएल करिता प्रायोजकतेचा करार झाला आहे ज्यात चीनमधील टेंन्सेन्ट या कंपनीत गुंतवणूक आहे. तथापि, चीनने भारतासोबत केलेल्या वागणुकीकडे दुर्लक्ष करून चिनी गुंतवणूक असलेल्या कंपनीची आयपीएलमधील पैशासाठी निवड केली जात आहे." अलीकडेच बिहार क्रिकेट असोसिएशनचे (BCA) सचिव आदित्य वर्मा यांनी ड्रीम 11 मध्ये चिनी कंपनीदेखील सहभागी असल्याचे म्हटले होते. (Dream11 Gets IPL 2020 Title Sponsorship: ड्रीम-11 बनली आयपीएल टायटल स्पॉन्सर, 222 कोटींची लगावली बोली)

वर्मा यांनी IANSला सांगितले की, "भारतीय क्रीडा क्षेत्राचा एक हितचिंतक म्हणून, आयपीएल 13 युएईमध्ये यशस्वीरित्या पार पडेल अशी मी प्रार्थना करतो. तथापि, ड्रीम11 आयपीएलचे टायटल स्पॉन्सर बनल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे 'आत्मानिभार भारत'चे स्वप्न ड्रीम11शी चिनी कनेक्शन असल्याने खंडित होईल. आयपीएलच्या एका फ्रेंचायझीमध्ये कंपनीची मोठी गुंतवणूक असल्याचेही समोर आले आहे," ते पुढे म्हणाले. विवोकडून बीसीसीआयला वर्षाकाठी 440 कोटी रुपये मिळायचे, तर ड्रीम11 बीसीसीआयला आगामी आवृत्तीसाठी 250 कोटी रुपये देऊ शकते. आयपीएल 2020 चे यंदा 19 सप्टेंबर ते 10 नोव्हेंबर दरम्यान युएई येथे आयोजन होणार आहे.

टाटा सन्स, Byju’s, अनअकॅडेमीसारख्या ब्रँडना मागे टाकत ड्रीम11 हक्क विकत घेतले. दरम्यानच्या काळात ड्रीम11 ने आयसीसी, प्रो-कबड्डी, FIH, बिग बॅश लिग यांसारख्या महत्वाच्या क्रीडा स्पर्धा आणि संघटनांना स्पॉन्सरशिप देण्यास सुरुवात केली. शिवाय, 2018 मध्ये कंपनीने धोनीला आपला ब्रँड अँबेसिडर म्हणून जाहीर केलं.