इंडियन प्रीमिअर लीगचे (Indian Premier League) अध्यक्ष ब्रिजेश पटेल (Brijesh Patel) यांनी ड्रीम 11 (Dream11) यावर्षी इंडियन प्रीमियर लीगच्या 13 व्या आवृत्तीचे टायटल स्पॉन्सर असेल, अशी घोषणा केली आहे. फँटसी गेमिंग स्टार्टअप कंपनीने 222 कोटी रुपयांची बोली लगावली. अनकाडेमी आणि टाटा सन्स, हे अन्य बोली लागवणारे होते. आयपीएल 2020 साठी चिनी कंपनी VIVOच्या जागी नवीन टायटल प्रायोजक जाहीर केले आहे. ही बोली विवोच्या वार्षिक 440 कोटींपेक्षा 190 कोटींनी कमी आहे. 14 ऑगस्ट रोजी यावर्षी स्पर्धेसाठी प्रायोजक म्हणून रस दाखविणाऱ्या टाटा सन्सला अव्वल दावेदार म्हणून पाहिले जात होते. यावर्षी 19 सप्टेंबर ते 10 नोव्हेंबर या कालावधीत संयुक्त अरब अमिरातीमध्ये (युएई) आयपीएल होणार आहे.यापूर्वी भारत आणि चीनमधील वाढत्या सीमा तणावामुळे बीसीसीआयने या मोसमातील विवो सोबतचा करणार रद्द केला होता. विवोने 2018 ते 2022 पर्यंत पाच वर्ष 2190 कोटी रुपयांत (प्रत्येक वर्षी 440 कोटी रुपये) आयपीएल टायटल स्पॉन्सरशिप अधिकार संपादन केले होते. (IPL 2020 Free Live Streaming: Jio च्या 'या' दोन रिचार्ज प्लॅनवर फ्री मध्ये पाहायला मिळेल आयपीएलचे लाइव्ह स्ट्रीमिंग, वाचा सविस्तर)
दरम्यान, पुढच्या वर्षी विव्हो मुख्य प्रायोजक म्हणून परत येऊ शकेल. आयपीएलच्या शीर्षक प्रायोजकांच्या शर्यतीत अनअकॅडेमी, टाटा आणि Byju’s हेदेखील सहभागी झाले होते. पण, ड्रीम11 ने सर्वांना पछाडत स्पॉन्सरशिप हक्क मिळवले. पीटीआयमध्ये नमूद केल्यानुसार टाटा समूहाने अंतिम बोली लावली नाही, Byju’sने 201 कोटी आणि अनअकॅडेमी 170 कोटी रुपयांची बोली लगावली.
Fantasy sports platform Dream11 wins IPL title sponsorship rights with a bid of Rs 222 crore: IPL Chairman Brijesh Patel to PTI
— Press Trust of India (@PTI_News) August 18, 2020
आयपीएलची सुरुवातीला 29 मार्च रोजी सुरुवात होणार होती, परंतु कोरोना व्हायरसमुळे स्पर्धा पुढे ढकलण्यात आली. आयपीएल 2020 19 सप्टेंबरपासून सुरू होईल आणि स्पर्धा 53 दिवस चालणार आहे. आयपीएल फायनल 10 नोव्हेंबरला होणार आहे, जे प्रसारकांना दिवाळीच्या आठवड्याचा फायदा करून देईल. रविवार ऐवजी अन्य दिवशी आयपीएलचे आयोजन करण्याचीही पहिलीच वेळ आहे. बीसीसीआयनुसार, यंदा आयपीएलचे 10 डबल हेडर (एका दिवशी दोन सामने) खेळले जातील. यावेळेस रात्री आठ ऐवजी सायंकाळी साडेसात वाजेपासून रात्रीचे सामने खेळलात जातील, तर दुपारचे सामने 3:30 वाजता सुरु होतील.