IPL 2020: जाता जाता दाखवला Spark! CSKच्या रुतुराज गायकवाडच्या दमदार अर्धशतकानंतर व्हायरल झाले पोट धरून हसवणारे मिम्स
(Photo Credit: Instagram)

IPL 2020: दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर नुकत्याच संपुष्टात आलेल्या इंडियन प्रीमियर लीगच्या (Indian Premier League) रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरविरुद्ध (Royal Challengers Bangalore) मनोबल वाढविणारा विजय मिळवत रविवारी तीन वेळा आयपीएल चॅम्पियन चेन्नई सुपर किंग्ज (Chennai Super Kings) विजय पथावर परतले. मोनू कुमारने आश्चर्यचकित पदार्पण केले तर सलामीवीर रुतुराज गायकवाड (Ruturaj Gaikwad) दमदार अर्धशतकी खेळी करत संघाचा विजय निश्चित केला. सीएसकेच्या (CSK) यंदा आयपीएल प्ले ऑफ (IPL PlayOffs) गाठण्याची शक्यता कमी असली तरी चाहते मात्र अद्यापही आशावादही आहेत आणि टीमच्या विजयानंतर सोशल मीडियावर धोनी आणि रुतुराजवर बरेच मिम्स व्हायरल होत आहेत. धोनीने यापूर्वी सामन्यातील पराभवानंतर युवा खेळाडूंमध्ये 'स्पार्क' नसल्याच्या विधानाने वाद ओढवला होता, अशास स्थितीत जाता जाता का होईना सीएसकेच्या युवा खेळाडूंकडून अखेर 'स्पार्क' दिसला. (IPL 2020 Play Off Scenario: आयपीएल प्ले ऑफसाठी कडक लढत; जाणून घ्या कोण कसं पटकावणार अंतिम-4 चं तिकीट)

रुतुराजच्या नाबाद अर्धशतकी खेळीनंतर धोनी आणि युवा फलंदाजांवर सोशल मीडिया यूजर्सने मिम्सचा पाऊस पडला जे नक्की तुम्हाला पोट धरून हसायला भाग पडतील. सीएसकेच्या विजयानंतर गायकवाडच्या खेळीचे तोंडभरून कौतुक केलं. त्याखेरीज ट्विटरवर 'स्पार्क' हा शब्द ट्रेंड होऊ लागला, जो सीएसकेचा कर्णधार धोनीने टीमच्या एका पराभवानंतर म्हणाला की, युवा खेळाडूंना प्लेइंग इलेव्हनमध्ये सामील करण्यासाठी त्याला त्यांच्यात 'स्पार्क दिसत नाही. पाहा हे मजेदार मिम्स:

स्पार्क दिसत नाही...

गायकवाडचा स्पार्क

कोहलीचा स्पार्क

स्पार्क दिसला!

त्याने स्पार्क सिद्ध केला

माही तू काय विचारले

मागील तीन सामन्यात रुतुराज फक्त पाच धावा करू शकला होता, पण आजच्या सामन्यात त्याने सकारात्मक फलंदाजी केली आणि 65 धावांवर नाबाद राहून सीएसकेला तीन सामन्यांचा पराभवानंतर पहिला विजय मिळवून देण्यात महत्वाची भूमिका बजावली. दरम्यान, सीएसकेविरुद्ध विजयाने रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरची टॉप-2 मध्ये सामील होण्याची प्रतीक्षा लांबणीवर पडली आहे. आरसीबी पॉईंट्स टेबलवर 14 गुणांसह तिसऱ्या स्थानावर बसले आहेत.