Sunita Williams यांची Boeing's Starliner सोबतची अंतराळ मोहिम शेवटच्या क्षणी रद्द
Sunita Williams | X

भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स (Sunita Williams) यांची अंतराळ मोहिम पुन्हा टळली आहे. उड्डाणाच्या काही मिनिटं आधी त्यांची मोहिम टळली. नासा च्या Kennedy Space Centre वरून हे उड्डाण होणार होतं. सध्या ही मोहिम रद्द करण्यात आली आहे. सुनिता विल्यम्स Boeing's Starliner spacecraft मधून उड्डाण करणार होत्या. याआधी देखील अशाच प्रकारे अख़ेरच्या टप्प्यात मोहिम रद्द करण्यात आली होती.

युनायटेड लाँच अलायन्स (ULA), जे Atlas V रॉकेट चालवते, जर शनिवारच्या प्रयत्नात समोर आलेल्या समस्येचे निराकरण झाले आहे, तर प्रक्षेपण 12:03 pm ET (भारतीय प्रमाणवेळेनुसार रात्री 9.33 वाजता) होईल. बुधवार आणि गुरुवारसाठी NASA ला अतिरिक्त प्रक्षेपण संधी देखील आहेत.

स्टारलाइनरच्या टेस्ट फ्लाईट मध्ये नासाच्या अंतराळवीर सुनीता 'सुनी' विलम्स आणि बॅरी 'बुच' विल्मोर यांना आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पाठवेल, जिथे ते अंतराळ यान मानवांसोबत कसे चालतात याची चाचणी घेण्यासाठी सुमारे एक आठवडा थांबतील. ISS मध्ये सध्या सात अंतराळवीर आहेत.

सुनीता विल्यम्स 2006 मध्ये वयाच्या 41 व्या वर्षी पहिल्यांदा अंतराळात गेल्या होत्या. तिथे त्यांनी 4  वेळा स्पेस वॉक केला. यानंतर 2012 मध्ये त्या अंतराळात गेल्या होत्या. सुनीता पुन्हा एकदा बोइंग स्टारलाइनर  सह अंतराळात जाण्यासाठी सज्ज आहेत.  सुनीताने 1995 मध्ये फ्लोरिडा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमधून पदव्युत्तर पदवी मिळवली. 1998 मध्ये नासामध्ये रुजू झाल्या आहेत.