Photo Credit -X

Norway Chess: आर प्रज्ञानंदने (R Pragananadhaa) नॉर्वे बुद्धिबळ स्पर्धेत आपले वर्चस्व कायम ठेवत शनिवारी क्लासिकल चेसमध्ये जागतिक क्रमवारीत दुसऱ्या क्रमांकाचा मातब्बर खेळाडू फॅबियानो कारुआनाचा पाचव्या फेरीत पराभव केला. या आधी त्याने पहिल्या क्रमांकावर असलेल्या मॅग्नस कार्लसन याचा पराभव केला होता. त्यामुळे त्याच्या क्रमवारीत वाढ होऊन तो जागतिक स्तरावर दुसऱ्या स्थानावर पोहचला आहे. (हेही वाचा:R Praggnanandhaa: आर प्रज्ञानंदचा 'क्लासिकल चेस'मध्ये दणदणीत विजय; मॅग्नस कार्लसनचा पराभव करत रचला इतिहास )

एक्सवर नॉर्वे चेसने त्याबाबत माहिती दिली. तसे ट्विट एक्सवर नॉर्वे चेसकडून करण्यात आले. त्यात त्यांनी लिहिले की, "प्रज्ञानंद परतला आहे. तरुण प्रगल्भ प्रज्ञानंदने पाचव्या फेरीत जागतिक क्रमवारीत दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या फॅबियानो कारुआनाला पराभूत करून बुद्धिबळ जगाला पुन्हा थक्क केले! तिसऱ्या फेरीत जागतिक क्रमवारीत नंबर 1 मॅग्नस कार्लसनला पराभूत केल्यानंतर, त्याने आता प्रथमच शास्त्रीय बुद्धिबळात पहिल्या दोन खेळाडूंना मागे टाकले आहे". असे नॉर्वे चेसच्या अधिकृत हँडलने ट्विट केले.

दुसरीकडे, प्रज्ञानंदची बहीण वैशाली हिने दिग्गज पिया क्रॅमलिंगचा पराभव करून आपले वर्चस्व कायम ठेवत एकूण 8.5 गुणांची आघाडी ठेवली. तर, भारतीय महिला बुद्धिबळ ग्रँडमास्टर हम्पी हिला चौथ्या फेरीत ॲना मुझीचुक विरुद्ध शास्त्रीय खेळात पराभव पत्करावा लागला.