OTT Releases Web Series: जून महिन्यात अनेक रोमांचक वेब सीरिज OTT प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित करण्यात आल्या आहेत. तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत सिरीज आणि चित्रपट पाहून आनंद घेऊ शकता. हे सिरीज प्रेक्षकांना जास्त मनोंरजन करतील. जूनमध्ये ब्लॅकआउट, हाऊस ऑफ द ड्रॅगन 2, द बॉईज सीजन 4, यासह अनेक वेव सीरिज प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'पंचायत'चा नवा भाग काही दिवसांपूर्वीच रिलीज झाला होता. या सीरिजची प्रेक्षकांना आतुरता होती. तर रिलीज झाल्यानंतर प्रेक्षकांनी या सीरिजचे कौतुक ही केले आहे. (हेही वाचा- 'औरो में कहा दम था' रोमॅंटीक चित्रपटाचा टीझर रिलीज, 'या' दिवशी सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला
हाऊस ऑफ द ड्रॅगन सीजन २
ही सीरिज जिओ सिनेमावर प्रदर्शित होणार आहे. येत्या १७ जून रोजी ही सीरिज रिलीज होणार. यात गेम ऑफ थ्रोन्सच्या प्रीक्वल सीरिज "हाऊस ऑफ द ड्रॅगन" च्या दुसऱ्या सीजनमध्ये ड्रॅगन्स आणि त्यांच्या शाही कुटुंबातील संघर्ष दाखवला जाणार आहे.
ब्लॅकआउट
ही सीरिज जिओ सिनेमावर प्रदर्शित होणार आहे. प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी 7 जून ला रिलीज होणार आहे. याची कथनाक शहरातील वीज गायब झाल्यावर घडते. प्रेक्षकांना रहस्यमय आणि थरार घटनेचा अनुभव घेता येणार आहे.
रॅगिंग व्हॉइसेस
नेटफ्लिक्सवर 'रॅगिंग व्हॉइसेस' ही वेबसिरीज रिलीज झाली आहे. ही कथा आहे एका 17 वर्षांच्या मुलीची ज्यावर शाळेत अत्याचार होतो. ही सीरिज रहस्यमय असणार आहे.
द बॉईज सीजन 4
द बॉईज सीजन 4 ही सीरिज प्राईम व्हिडिओवर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यात प्रेक्षकांना अॅक्शनसह कॉमेडीचा तडखा असणार आहे. "द बॉईज" या सीरिजमध्ये सुपरहिरोच्या अतिरेकाविरोधात लढणाऱ्या नायकांची कथा आहे. चौथ्या सीजनमध्ये आणखी रोमांचक गोष्टी आणि ट्विस्ट प्रेक्षकांना पाहायला मिळतील.