Auron Mein Kahan Dum Tha Teaser: 'औरो में कहा दम था' रोमॅंटीक चित्रपटाचा टीझर रिलीज, 'या' दिवशी सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला

बहुप्रतिक्षित औंरो मे कहा दम था या रोमॅंटीक चित्रपटाचा टीझर रिलीज झाला आहे. चित्रपटामध्ये बॉलिवूडचा अभिनेता अजय देवगण आणि अभिनेत्री तब्बू झळकणार आहे.

Auron Mein Kahan Dum Tha Teaser: 'औरो में कहा दम था' रोमॅंटीक चित्रपटाचा टीझर रिलीज, 'या' दिवशी सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला
Auron Mein Kahan Dum Tha Teaser: PC youtube

Auron Mein Kahan Dum Tha Teaser: बहुप्रतिक्षित 'औंरो मे कहा दम था' या रोमॅंटीक चित्रपटाचा टीझर रिलीज झाला आहे. चित्रपटामध्ये बॉलिवूडचा अभिनेता अजय देवगण आणि अभिनेत्री तब्बू झळकणार आहे. हा चित्रपट येत्या 5 जुलै रोजी प्रदर्शित होणार आहे. चित्रपटामध्ये लव्ह स्टोरी रंजक पध्दतीने दाखवण्यात आली आहे.  चित्रपटाच्या टीझरमध्ये होळीच्या सणा निमित्त अजय आणि तब्बू प्रेमरंगात रंगून  एकमेकांना मिठी मारताना दिसत आहे. चित्रपटासाठी अजय आणि तब्बूच्या चाहत्यांनी उत्सुकता दाखवली आहे. 90 च्या दशकापासून तब्बू आणि अजय देवगण या दोघांन्ही प्रेक्षकांचे मनोरंजन केले. (हेही वाचा- अभिनेत्री शुभांगी अत्रे डोंगरात घेत आहे सुट्ट्यांचा आनंद, सोशल मीडियावर शेअर केली सुंदर छायाचित्रे, पाहा फोटो

'दृश्यम' आणि 'दृश्यम' 2 या दोन्ही चित्रपटात तब्बू आणि अजय देवगण यांनी कमालीची अॅक्टींग केली होती. दोन्ही चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली होती. 90 च्या आणि 2000 च्या दशकातील बॉलिवूड सिनेमातील कमालीची जोडी म्हणजे तब्बू आणि अजय देवगण. आता पर्यंत दोघांन्ही 9 सिनेमात एकत्र काम केले आहे. प्रेक्षकांच्या मनोरंजानासाठी 10 व्यांदा दोघेही पुन्हा एकदा रोमॅंटीक सिनेमात झळकणार आहे.

नीरज पांडे यांनी हा चित्रपट दिग्दर्शन केले आहे. सिनेमात आणखी कोणते सहकलाकार असणार आहेत या संदर्भात कोणतीही अधिकृत माहिती नाही. या चित्रपटात रोमॅंटीक थ्रीलर प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.  सोशल मीडियावर प्रदर्शित झालेला टीझर पाहून प्रेक्षकांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे.

(The above story first appeared on LatestLY on May 31, 2024 02:54 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).