Four Shooters Arrested by Panvel Police: बॉलिवूड अभिनेता सलमान खान (Salman Khan) च्या जीवाला धोका असल्याचं पुन्हा एकदा उघड झालं आहे. सलमानवर पुन्हा हल्ला करण्याचा कट रचला जात होता. मात्र, मुंबई पोलिसांनी हा प्रयत्न हाणून पाडला. नवी मुंबई पोलिसांनी (New Mumbai Police) याप्रकरणी चौघांना अटक (Arrest) केली आहे. अटक करण्यात आलेले चार आरोपी हे लॉरेन्स बिश्नोई टोळी (Lawrence Bishnoi Gang) चे सदस्य आहेत.
सलमानच्या कारवर हल्ला करण्याचा कट -
पनवेलमध्ये सलमान खानच्या गाडीवर हल्ला करण्याचा आरोपींचा कट होता, अशी माहिती नवी मुंबई पोलिसांनी दिली. कारची तोडफोड करण्यासाठी पाकिस्तानातून पुरवठादाराकडून शस्त्रे मिळवण्याचा कटही रचला जात होता. या प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत लॉरेन्स बिश्नोई, अनमोल बिश्नोई, गोल्डी ब्रार, संपत नेहरा यांच्यासह 17 जणांविरुद्ध एफआयआर नोंदवला आहे. (हेही वाचा -Salman Khan Firing Case: सलमान खान फायरिंग केसमधील आरोपीच्या मृत्यूमागे मोठे षडयंत्र; शिवसेना उद्धव ठाकरे गटातील नेत्याकडून चौकशीची मागणी)
धनंजय उर्फ अजय कश्यप, गौरव भाटिया उर्फ न्हवी, वास्पी खान उर्फ वसीम चिकना आणि रिजवान खान उर्फ जावेद खान अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. काही मीडिया रिपोर्ट्समध्ये असा दावा केला जात आहे की आरोपींनी फार्म हाऊस आणि इतर अनेक ठिकाणांची रेक केली होती. या लोकांना सलमान खानवर एके-47 आणि इतर अनेक शस्त्रांनी गोळीबार करण्याचे आदेश मिळाले होते. (हेही वाचा:Salman Khan House Firing Case: सलमान खानच्या घरावर गोळीबार प्रकरणातील मोठी बातमी; आरोपीचा पोलीस कोठडीत आत्महत्येचा प्रयत्न)
चौकशीदरम्यान आरोपींनी अजय कश्यप एम-16, एके-47 आणि एके-92 खरेदी करण्यासाठी पाकिस्तानातील डोगा नावाच्या व्यक्तीच्या संपर्कात असल्याचे उघड केले. याआधी 14 एप्रिलला देखील सलमान खानच्या वांद्रे येथील गॅलेक्सी अपार्टमेंटसमोर पहाटे 5 वाजता गोळीबार करण्यात आला होता. दोन दुचाकींवर आलेल्या हल्लेखोरांनी पाच राऊंड फायर केले होते. गोळीबाराच्या वेळी सलमान घरातच होता. या घटनेनंतर सलमानच्या घराबाहेर सुरक्षा वाढवण्यात आली होती. दोन दिवसांनी गोळीबार करणारे दोन्ही आरोपी पकडले गेले. खानला लॉरेन्स बिश्नोई-गोल्डी ब्रार टोळीकडून जीवे मारण्याच्या धमक्या आल्या होत्या.