Salman Khan House Firing Case: अभिनेता सलमान खानचे मुंबईतील घर गॅलेक्सी अपार्टमेंटबाहेर 14 एप्रिल रोजी गोळीबार झळा होता. सध्या या गोळीबार प्रकरणाच्या तपासात पोलीस व्यस्त आहेत. आरोपींची चौकशी सुरू आहे. अशात मीडिया रिपोर्ट्सनुसार यातील एका आरोपीने आत्महत्येचा प्रयत्न केल्याची बातमी येत आहे. रिपोर्टनुसार, आरोपी अनुज थापनने पोलीस कस्टडीमध्ये आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. थापनला जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आरोपींना मुंबई पोलीस मुख्यालयातील गुन्हे शाखेच्या कार्यालयात चौकशीसाठी लॉकअपमध्ये ठेवण्यात आले होते. अनुजवर नेमबाजांना शस्त्रे पुरवल्याचा आरोप आहे. या गोलीबात प्रकरणातील आरोप विकी आणि सागर यांना कच्छ, गुजरात येथून अटक करण्यात आली. तर अनुज थापन आणि सोनू कुमार चंदर बिश्नोई यांना पंजाबमधून अटक करण्यात आली. अनुजवर नेमबाजांना शस्त्रे पुरवल्याचा आरोप आहे. (हेही वाचा: Salman Khan Residence Firing Case: सलमान खान निवासस्थान गोळीबार प्रकरणी 3 आरोपींच्या कोठडीत 8 मे पर्यंत वाढ)

पहा पोस्ट-

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)