Salman Khan Residence Firing Case: सलमान खान निवासस्थान गोळीबार प्रकरणी 3 आरोपींच्या कोठडीत 8 मे पर्यंत वाढ
Salman Khan (PC - Instagram)

Salman Khan Residence Firing Case: अभिनेता सलमान खान (Salman Khan) च्या वांद्रे येथील निवासस्थानावर झालेल्या गोळीबारप्रकरणी (Firing Case) अटक (Arrest) करण्यात आलेल्या तीन आरोपींना विशेष न्यायालयाने सोमवारी 8 मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. दरम्यान, एका आरोपीला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. विशेष MCOCA न्यायाधीश एएम पाटील यांनी विकी गुप्ता (24), सागर पाल (21) आणि अनुज थापन (32) यांना पोलीस कोठडी सुनावली. तसेच सोनू कुमार चंदर बिश्नोई (37) याला वैद्यकीय कारणास्तव न्यायालयीन कोठडीत पाठवले.

पोलिसांनी शनिवारी कथित नेमबाज गुप्ता आणि पाल तसेच दोन बंदुक आणि गोळ्या पुरवल्याचा आरोप असलेले बिश्नोई आणि थापन आणि गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई आणि त्याचा भाऊ अनमोल यांच्या विरोधात महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यातील तरतुदी लागू केल्या. (हेही वाचा - Salman Khan Residence Firing Case: सलमान खानच्या निवासस्थानी झालेल्या गोळीबारप्रकरणी मोठी बातमी!आरोपी सोनू कुमार बिश्नोई आणि अनुज थापन यांना 30 एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी)

दरम्यान, आरोपींवर यापूर्वी भारतीय दंड संहिता आणि शस्त्रास्त्र कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. 14 एप्रिलच्या पहाटे वांद्रे येथील गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये मोटारसायकलवरून आलेल्या दोन व्यक्तींनी गोळीबार केल्यानंतर पोलिसांनी प्रथम माहितीचा अहवाल नोंदवला होता. (Salman Khan Attends Heeramandi Premiere: संजय लीला भन्साळी यांच्यासोबतचे मतभेद बाजूला ठेवून सलमान खान कडेकोट बंदोबस्तात पोहोचला हीरामंडीच्या प्रीमियरला)

गुप्ता आणि पाल हे दोघेही बिहारचे रहिवासी आहेत, त्यांना 16 एप्रिल रोजी शेजारच्या गुजरातमधील कच्छमधून, तर सोनू बिश्नोई आणि थापन यांना 25 एप्रिल रोजी पंजाबमधून अटक करण्यात आली होती. अनमोल बिश्नोई याने फेसबुक पोस्टद्वारे गोळीबाराची जबाबदारी स्वीकारली होती.