IPL 2020 Play Off Scenario: आयपीएल प्ले ऑफसाठी कडक लढत; जाणून घ्या कोण कसं पटकावणार अंतिम-4 चं तिकीट
एमएस धोनी आणि रोहित शर्मा (Photo Credit: PTI)

IPL 2020 Play Off Scenario: इंडियन प्रीमिअर लीग (Indian Premier League) 2020 आता शेवटच्या टप्प्यात आहे आणि आता संघांमध्ये प्ले ऑफमध्ये स्थान मिळवण्यासाठी कडू लढत पाहायला मिळत आहे. मुंबई इंडियन्स (Mumbai Indians), रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर आणि दिल्ली कॅपिटल्सने (Delhi Capitals) प्ले ऑफ स्थानावर शिक्कामोर्तब केला आहे, परंतु खरा लढा अंतिम, चौथ्या स्थानासाठी आहे. आयपीएल (IPL) 2020 च्या प्लेऑफची शर्यत अतिशय तणावपूर्ण आणि मनोरंजक होत आहे. मागील काही सामन्याने पॉईंट्स टेबलचे चित्र बदलले आहे. दिल्ली कॅपिटल्स आणि आरसीबीला (RCB) त्यांच्या मागील सामन्यात प्ले ऑफ गाठण्याची संधी होती, मात्र केकेआर आणि सीएसकेने अंतिम क्षणी सामन्यात पुनरागमन केले आणि गुणतालिकेत अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानावर असलेल्या संघांना धक्कादायक पराभवाला सामोरे जावे लागले अशा स्थितीत 11 सामन्यानंतर एकाही संघाला प्ले ऑफचं तिकीट मिळवता आलेलं नाही. त्यामुळे आज आपण पाहूया कोणता संघ कसा प्ले ऑफमध्ये पोहचू शकतो. (IPL 2020: युएई येथील 13व्या हंगामात ‘हे’ 5 मॅच विनर खेळाडू ठरले फ्लॉप; एमएस धोनी, ग्लेन मॅक्सवेलसह दिग्गज खेळाडूंचा समावेश)

गुणतालिकेत पहिल्या तीन स्तनावर असलेल्या मुंबई इंडियन्स, दिल्ली कॅपिटल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर यांना अंतिम-4 फेरीत पोहचण्यासाठी एका विजयाची गरज आहे. पण प्ले ऑफची शर्यत मनोरंजक होत असल्याने त्यांना ते कठीण जाताना दिसत आहे. दिल्ली आणि बेंगलोरला मिळालेली संधी कोलकाता आणि चेन्नईने हिरावली. आयपीएल अंतिम-स्थानी असलेले अखेरचे चार संघ आघाडीच्या संघांना कडू झुंझ देत आहेत, पण एक विजय या संघांना प्ले ऑफचं तिकीट मिळवून देऊ शकतं. दुसरीकडे, चौथ्या स्थानी असलेल्या केकेआरला त्यांचे आगामी सामन्यात विजय मिळवणे गरजेचे असेल, तर एक पराभव त्यांच्या प्ले ऑफच्या शक्यता कमी करू शकते.

दुसरीकडे, अंतिम-चार संघांना प्ले ऑफ गाठण्यासाठी मोठ्या फरकाने विजय मिळवावा लागेल. सीएसकेला उर्वरित सामने (कोलकाता नाइट रायडर्स, किंग्ज इलेव्हन पंजाब) मोठ्या फरकाने जिंकून इतर निकालही त्यांच्या बाजूने लागतील याची आशा करायला पाहिजे. एमएस धोनी आणि संघ केकेआर- पंजाबच्या सामन्यावर बारीक नजर ठेवून असतील. राजस्थान आणि हैदराबाद हे दोघे आठवर आहेत आणि कमीत कमी 14 गुण मिळवू शकतात, त्यामुळे उर्वरित तीन सामन्यांपैकी दोन्ही संघांनी कमीतकमी एक सामना गमावल्यास सीएसकेला संधी मिळू शकते. शिवाय, सनरायझर्स हैदराबाद, राजस्थान रॉयल्स आणि किंग्ज इलेव्हन पंजाब यांना आगामी सर्व सामने जिंकणे गरजेचे आहे. दरम्यान, केकेआरचा पुढील सामन्यात पराभव झाल्यास आणि किंग्स इलेव्हनने आपले सर्व सामने जिंकल्यास केएल राहुलच्या पंजाबकडे प्ले ऑफसाठी पात्र ठरण्याची संधी आहे कारण केएक्सायपीचा नेट रनरेट केकेआरहुन चांगला आहे. अशा स्थतीत पंजाबकडे अद्यापही अंतिम-4 मध्ये प्रवेश मिळवण्याची संधी आहे.