Google News Down: याआधी अनेकवेळा फेसबुक, इंस्टाग्रामसारखे सोशल मिडिया डाऊन झाल्याच्या बातम्या आल्या आहेत, मात्र आज चक्क गुगल न्यूज डाऊन झाले. अनेक लोकांनी आज, 31 मे रोजी X (पूर्वीचे ट्वीटर) वर गुगल न्यूज सर्च टॅब बंद असून, ते कोणतेही परिणाम दाखवत नसल्याबद्दल तक्रार केली. मायक्रोब्लॉगिंग साइटवर अनेक लोकांनी, गुगल न्यूज सर्च बंद पडले आहे का? अशी विचारणा केली. वापरकर्त्याने असेही म्हटले की, सर्च करताना कोणतेही परिणाम दिसत नाहीत. दुसऱ्या एका वापरकर्त्याने सांगितले की, ‘गुगल न्यूज टॅब’ मध्ये सर्च केले असता काहीही रिझल्ट्स दिसत नाहीत. वापरकर्त्यांनी गुगल न्यूज डाऊन झाल्याबद्दल तक्रार करण्यास सुरुवात केल्यामुळे, #GoogleNews X वर ट्रेंड व्हायला सुरुवात झाली. (हेही वाचा: Assam: आसाम येथे विद्यार्थ्यांनी घेतले AI आधारित 'आयरिस' या रोबोट कडून शिक्षणाचे धडे, गमतीशीर व्हिडीओ व्हायरल)

पहा पोस्ट- 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)