Arjun Kapoor-Malaika Arora Break-Up: मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर हे त्यांच्या लव्ह लाईफमुळे नेहमीच चर्चेत राहिले आहेत. गेल्या 5 ते 6 वर्षांपासून दोघे नेहमीच एकत्र दिसत आले आहेत. अनेक रिपोर्ट्समध्ये त्यांच्या एकत्र असण्याचा दावा केला होता. आता एकेकाळी आपल्या रोमान्समुळे प्रसिद्धी मिळवणारे हे कपल गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या ब्रेकअपमुळे पुन्हा चर्चेत आले आहे. बातमी आहे की, 5 वर्षानंतर हे दोघे वेगळे झाले आहेत. अरबाज खानपासून वेगळे झाल्यानंतर लगेचच मलायकाने अर्जुनसोबतचे नाते अधिकृत केले. आता अर्जुन आणि मलायका यांचे ब्रेकअप झाल्याची चर्चा चित्रपट वर्तुळात आहे. पिंकविलाच्या रिपोर्टनुसार, दोघांनी परस्पर संमतीने कायमचे वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे. या वर्षी जानेवारीमध्ये मलायका आणि अर्जुनचे ब्रेकअप झाल्याच्या बातम्या आल्या होत्या. आतापर्यंत अर्जुन कपूर किंवा मलायका अरोरा या दोघांनीही त्यांच्या ब्रेकअपच्या वृत्ताला दुजोरा दिलेला नाही. लेटेस्टली मराठी त्यांच्या ब्रेकअपची पुष्टी करत नाही. (हेही वाचा: Munawar Faruqui: मुनव्वर फारुकीने दुसऱ्यांदा केलं लग्नं; जवळचे नातेवाईक, मित्र-मैत्रिणींच्या उपस्थितीत पार पडला सोहळा)

पहा पोस्ट- 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)