Madras High Court on Live-in Relationship: मद्रास उच्च न्यायालयाने लिव्ह-इन रिलेशनशिपबाबत एक महत्वाचा निर्णय दिला आहे. मद्रास उच्च न्यायालयाने म्हटले आहे की, विवाहित पुरुष आणि दुसरी महिला यांच्यातील विवाहबाह्य संबंधांना 'लिव्ह-इन' संबंध म्हणता येणार नाही, तसेच असे लिव्ह-इन संबंध वैध नाहीत. न्यायालयाने म्हटले की, अशा नातेसंबंधांमध्ये विवाहाच्या आवश्यक गोष्टींचा अभाव आहे आणि ते उपपत्नी नातेसंबंधांपेक्षा अधिक काही नाहीत. उच्च न्यायालयाने असेही म्हटले की, दोन व्यक्ती अविवाहित आणि प्रौढ असतील आणि दोन्ही पक्षांनी त्यांचे जीवन त्यांच्या पद्धतीने जगण्याचे निवडल्यास परिस्थिती वेगळी असू शकते.

न्यायालयाने नमूद केले, एक विवाहित पुरुष आणि अविवाहित महिला यांच्यातील लिव्ह-इन संबंध हे ‘विवाहाचे स्वरूप’ नाही, त्यामुळे या ठिकाणी कोणताही कायदा लागू होत नसल्याने, एक लिव्ह-इन पार्टनर दुसऱ्या पक्षाच्या मालमत्तेमध्ये हक्क मागू शकत नाही. कनिष्ठ न्यायालयाच्या आदेशाला आव्हान देणाऱ्या पी जयचंद्रन नावाच्या व्यक्तीने दाखल केलेल्या अपीलावर सुनावणी करताना न्यायालयाने हा आदेश दिला. (हेही वाचा: Man Brutally Thrashed by Girlfriend's Family: रात्रीच्या अंधारात प्रेयसीला भेटायला गेला तरुण; मुलीच्या कुटुंबीयांनी केली बेदम मारहाण, व्हिडिओ व्हायरल)

पहा पोस्ट- 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)