Man Brutally Thrashed by Girlfriend's Family: रात्रीच्या अंधारात प्रेयसीला भेटायला गेला तरुण; मुलीच्या कुटुंबीयांनी केली बेदम मारहाण, व्हिडिओ व्हायरल (Watch)
व्हिडिओमध्ये दिसत आहे की, व्यक्ती ट्रंकमधून बहारे पडत आहे, तर कुटुंबातील सदस्य जवळच लाठ्या घेऊन उभे आहेत. हा तरुण हात जोडून विनवणी करत आहे मात्र कुटुंबीय त्याला मारहाण करणे चालूच ठेवतात.
Man Brutally Thrashed by Girlfriend's Family: उत्तर प्रदेशातील आझमगडमधील देवगाव कोतवाली भागातील सोफीपूर गावात एका प्रियकराला बेदम मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. रात्रीच्या अंधारात हा तरुण आपल्या प्रेयसीला भेटायला गेला होता. मात्र याबाबत मुलीच्या कुटुंबियांना माहिती मिळाली. त्यांनी मुलीचे रूम तपासली असता, हा तरुण ट्रंकमध्ये लपलेला आढळला त्यानंतर त्याला बेदम मारहाण करण्यात आली. याबाबत माहिती मिळताच पोलिसांच्या मध्यस्थीनंतर तरुणाची सुटका करण्यात आली. मात्र या घटनेबाबत पोलिसांनी आरोपींवर कोणतीही कारवाई केलेली नाही.
कुटुंबातील एका सदस्याने रेकॉर्ड केलेल्या घटनेच्या व्हिडिओमध्ये दिसत आहे की, व्यक्ती ट्रंकमधून बहारे पडत आहे, तर कुटुंबातील सदस्य जवळच लाठ्या घेऊन उभे आहेत. हा तरुण हात जोडून विनवणी करत आहे मात्र कुटुंबीय त्याला मारहाण करणे चालूच ठेवतात. या संपूर्ण प्रकरणाबाबत पोलीस अधीक्षक शैलेंद्र लाल सांगतात की, सोशल मीडियावर एका तरुणाला मारहाणीचा एक व्हिडीओ समोर आला होता. याबाबत चौकशी केली असता समोर आले की, एक मुलगा विवाहित महिलेच्या घरात घुसला होता. त्यानंतर कुटुंबीयांनी मिळून त्याला मारहाण केली. याचा तपास देवगाव निरीक्षकांकडे सोपविण्यात आला आहे. (हेही वाचा: Gadchiroli Leopard Video: रात्रीच्या अंधारात शिकारीसाठी आला बिबट्या, शिकार करतांना पडला विहिरीत, व्हिडीओ व्हायरल)
पहा व्हिडिओ-
#WATCH | Man Brutally Thrashed After Getting Caught Hidden Inside Trunk At Girlfriend’s Home In UP’s Azamgarh#indianews #uttarpradesh pic.twitter.com/eKIIIiTtgE
— Free Press Journal (@fpjindia) June 18, 2024
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Jun 18, 2024 11:14 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

