Pimpri-Chinchwad Community Wedding: पिंपरी-चिंचवडमध्ये मंगळवारी एक अनोखा सामुदायिक विवाह पार पडला, ज्यामध्ये पाच ट्रान्सजेंडर महिलांनी त्यांच्या पुरुष जोडीदाराशी हिंदू विवाह कायद्यानुसार विवाह केला. 'नारी द वुमन' या स्वयंसेवी संस्थेने आयोजित केलेला हा विवाहसोहळा काळेवाडीतील बालाजी लॉन्स येथे पार पडले. साखरपुडा, हळद असे सर्व विधी एकाच दिवशी पार पडली. यावेळी अमन गुप्ता आणि शिवन्या शिंदे, गौरव लोंढे आणि अदनान मणियार, माधुरी वैरागे आणि संतोष चव्हाण, रोहिणी तायडे आणि धीरज सोनवणे आणि आकाश कसबे व उमेश खान ही पाच जोडपी विवाहबद्ध झाली आहेत. यापैकी बहुतेक जोडपी दीर्घकाळ रिलेशनशिपमध्ये होती, परंतु विविध अडथळ्यांमुळे ते अधिकृतपणे लग्न करू शकले नाहीत. या सामुदायिक विवाह सोहळ्याला अनेक सामाजिक कार्यकर्ते आणि राजकारणी उपस्थित होते. यावेळी बोलताना चिंचवडचे आमदार शंकर जगताप म्हणाले, ‘हा विवाह सोहळा पिंपरी-चिंचवडच्या इतिहासाचा एक भाग असेल. शहराने संपूर्ण देशासाठी एक नवा आदर्श घालून दिला आहे.’ (हेही वाचा: Voice Change Surgery Package: ट्रान्सजेंडर व्यक्तींना दिलासा! बॉम्बे हॉस्पिटलमध्ये सुरू झाले ट्रान्स पर्सन्ससाठी भारतातील पहिले अनुदानित व्हॉइस चेंज शस्त्रक्रिया पॅकेज, जाणून घ्या शुल्क)

पिंपरी-चिंचवडमध्ये पार पडला सामुदायिक विवाहसोहळा-

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)