HC Decision on Live-In Relationship: केरळ हायकोर्टाने लिव्ह-इन रिलेशनशिपबाबत महत्त्वपूर्ण टिपण्णी केली आहे. न्यायालयाने नुकत्याच दिलेल्या निर्णयात म्हटले आहे की, न्यायालयाने म्हटले की, कायदेशीररित्या विवाहित नसलेल्या महिलेच्या जोडीदारावर आयपीसी कलम 498A अंतर्गत क्रूरतेच्या गुन्ह्यासाठी खटला चालवला जाऊ शकत नाही. उच्च न्यायालयाने म्हटले आहे की, भारतीय दंड संहितेच्या कलम 498A मध्ये एखाद्या महिलेवर तिचा पती किंवा त्याच्या नातेवाईकांकडून क्रुरतेसाठी शिक्षेची तरतूद आहे. कोर्टाने पुढे म्हटले की, लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहणारे जोडपे विवाहित नसल्यामुळे तो पुरुष 'नवरा' या शब्दाच्या कक्षेत येत नाही. तक्रारदार महिलेचा लिव्ह-इन पार्टनर असलेल्या याचिकाकर्त्याविरुद्धची कारवाई रद्द केल्यानंतर न्यायालयाने गुरुवारी हा निकाल दिला. या पुरुषाने मार्च 2023 ते ऑगस्ट 2023 या कालावधीत महिलेचा मानसिक आणि शारीरिक छळ केल्याचा आरोप होता, (हेही वाचा: Ahmedabad: पोलिस व्हॅनमध्ये तरुण मद्यपान करतानाचा व्हिडिओ व्हायरल, गुजरात येथील घटना)
पहा पोस्ट-
Woman's Partner In Live-In Relationship Cannot Be Prosecuted For Offence Of Cruelty U/S 498A IPC: Kerala High Court | @TellmyJolly https://t.co/CSerlJtSWI
— Live Law (@LiveLawIndia) July 11, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)