Dowry Death Charges Against Live-In Partner: 'लिव्ह इन रिलेशनशिपमध्येही दाखल होऊ शकतो हुंडाबळीचा गुन्हा'; Allahabad High Court चा मोठा निर्णय

लिव्ह इन प्रेयसीवर हुंड्यासाठी छळ केल्याचा आरोप आहे. प्रियकराच्या या छळाला कंटाळून प्रेयसीने आत्महत्या केली होती. या प्रकरणी पोलिसांनी आरोपपत्र दाखल केले होते. आरोपीने निर्दोष मुक्तीसाठी याचिका दाखल केली होती, ती ट्रायल कोर्टाने फेटाळली होती.

Dowry Death Charges Against Live-In Partner: 'लिव्ह इन रिलेशनशिपमध्येही दाखल होऊ शकतो हुंडाबळीचा गुन्हा'; Allahabad High Court चा मोठा निर्णय
Allahabad High Court (PC - Wikipedia)

लिव्ह इन रिलेशनशिपच्या एका प्रकरणात अलाहाबाद उच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. जर पती-पत्नी सारखे लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहत असतील तर, त्यांच्यावरही हुंड्यासाठी छळ केल्याचा गुन्हा दाखल केला जाऊ शकतो, असे न्यायालयाने म्हटले आहे. पती-पत्नीसारखे लिव्ह इनमध्ये राहेन हा हुंडाबळीसाठी पुरेसा आधार असल्याचे उच्च न्यायालयाने म्हटले आहे. आदर्श यादव यांची याचिका फेटाळताना उच्च न्यायालयाने हे नमूद केले आहे. आदर्श यादव याच्या वतीने उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. हुंड्यासाठी छळ केल्याच्या आरोपाखाली प्रयागराज पोलीस ठाण्यात याचिकाकर्त्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लिव्ह इन प्रेयसीवर हुंड्यासाठी छळ केल्याचा आरोप आहे. प्रियकराच्या या छळाला कंटाळून प्रेयसीने आत्महत्या केली होती. या प्रकरणी पोलिसांनी आरोपपत्र दाखल केले होते. आरोपीने निर्दोष मुक्तीसाठी याचिका दाखल केली होती, ती ट्रायल कोर्टाने फेटाळली होती. त्यानंतर त्याने उच्च कोर्टात धाव घेतली. आपण तिचा नवरा नाही, त्यामुळे आपल्यावर हुंड्यासाठी छळाचा गुन्हा दाखल करता येणार नाही, असे याचिकाकर्त्याच्या वतीने सांगण्यात आले. न्यायालयाने आदर्श यादवची याचिका फेटाळत म्हटले की, मृत व्यक्ती कायदेशीररित्या विवाहित पत्नी नव्हती, परंतु पुराव्यावरून असे दिसून येते की दोघेही पती-पत्नीसारखे एकत्र राहत होते, त्यामुळे या प्रकरणात हुंडा मृत्यूच्या तरतुदी लागू होतात. (हेही वाचा: Allahabad High Court: ‘खोट्या आरोपात वैवाहिक नाते आबाधित ठेवण्याची कोणत्याच जोडीदाराची इच्छा नसते’, अलाहाबाद उच्च न्यायालयाचे घटस्फोटाच्या याचिकेवर निरीक्षण)

Dowry Death Charges Against Live-In Partner-

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Oct 08, 2024 04:57 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).