Aamir Khan Finds Love Again: अभिनेता आमिर खान पुन्हा एकदा प्रेमात पडला? बेंगळुरूमधील एका महिलेसोबत रिलेशनशिपमध्ये असल्याची चर्चा
आमिरने आपले खासगी आयुष्य गुपित ठेवले आहे. त्यामुळे अभिनेत्याकडून त्याच्या नव्या नात्याबद्दल अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. परंतु जर अहवाल खरा असेल तर, लवकरच त्याच्या आयुष्यातील एक नवीन अध्याय सुरू होऊ शकतो.
जेव्हा आमिर खानने त्याची दुसरी पत्नी किरण राव हिला घटस्फोट दिला, तेव्हा त्याच्या अनेक चाहत्यांना धक्का बसला होता. त्यानंतर अनेक मुलाखतीमध्ये, माध्यमांसमोर आमिर आणि किरण हे अजूनही चांगले मित्र असल्याचे दिसून आले. आता आमिर खान पुन्हा एकदा प्रेमात पडल्याचे वृत्त आहे. अहवालानुसार, अभिनेता बेंगळुरूमधील एका महिलेसोबत रिलेशनशिपमध्ये आहे. फिल्मफेअरच्या वृत्तानुसार, 59 वर्षीय अभिनेता या महिलेला डेट करत असून, तो तिच्याबद्दल अतिशय गंभीर आहे. त्याने नुकतेच या महिलेची आपल्या कुटुंबाशी ओळख करून दिली. आमिरने आपले खासगी आयुष्य गुपित ठेवले आहे. त्यामुळे अभिनेत्याकडून त्याच्या नव्या नात्याबद्दल अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. परंतु जर अहवाल खरा असेल तर, लवकरच त्याच्या आयुष्यातील एक नवीन अध्याय सुरू होऊ शकतो.
दरम्यान, आमिर आणि रीना दत्ता यांनी 1986 मध्ये लग्न केले आणि त्यांना दोन मुले आहेत- मुलगी इरा खान आणि मुलगा जुनैद खान. पुढे 2002 मध्ये या जोडप्याचा घटस्फोट झाला. आमिरने नंतर 2005 मध्ये फिल्ममेकर किरण रावशी लग्न केले आणि 2021 मध्ये त्यांनी लग्नाच्या 15 वर्षानंतर वेगळे होण्याची घोषणा केली. त्यांना एक मुलगा आझाद आहे, ज्याचा जन्म सरोगसीद्वारे झाला आहे. (हेही वाचा: Mom-To-Be Athiya Shetty Radiates Pregnancy Glow: इंस्टावर बेबी बंपचे फोटो शेअर करून अथिया शेट्टीने दाखवला प्रेग्नेंसी ग्लो)
Aamir Khan Finds Love Again:
Happy news has come to Filmfare’s doors a few days before Valentine’s Day this year. And this is a big one. Our sources have told us that there’s a new mystery woman in #AamirKhan’s life and the relationship is getting serious.
Read more at the link in our bio. 🔗 #News pic.twitter.com/fG8jPWwmTe
— Filmfare (@filmfare) January 31, 2025
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Jan 31, 2025 06:43 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

