पाऊस आणि तापमान | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

Maharashtra Weather Update: महाराष्ट्रात काही ठिकाणी रिमझिम पावसाची सुरुवात झाली आहे. आज रविवारी तुरळक भागात पाऊस (Rain) पडण्यासाठी शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. राज्यातील तापमानात घट होताना दिसत आहे. येत्या 5 जून पर्यंत राज्य भरात पाऊस पडेल. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भाला बुधवारपर्यंत यलो अर्लट देण्यात आला आहे. आजपासून मध्यम ते हलक्या स्वरुपाचा पाऊस असणार आहे. (हेही वाचा- केरळनंतर तामिळनाडूत मान्सूनची एंट्री; पहा महाराष्ट्रात कधी दाखल होणार?

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, या जिल्ह्यात तुरळक ठिकाणी वातावरण उष्ण व दमट राहण्याची शक्यता आहे. सोलापूर, सांगली, सातारा, कोल्हापूर, नांदेड, लातूर, धाराशीव या जिल्ह्यांना आज रविवारी यलो अर्लट दिला आहे. या ठिकाणी मेगगर्जना आणि विजांचा कडकडाट व ताशी ५० किमी वेगाच्या वादळी वाऱ्यांसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

विदर्भाता चंद्रपूर, नागपूर, वर्धा जिल्ह्यात उष्णतेची लाट असणार आहे.  विदर्भातातील काही भागात हलक्या स्वरुपाचा पाऊस असणार आहे. पाच जूनपर्यंत विदर्भात बहुतांश जिल्ह्यात मेघगर्जना विजांचा कडकडाट व ४० ते ५० किलोमीटर वेगाच्या वाऱ्यासह पावसाचा अंदाज आहे. त्यामुळे या सर्व ठिकाणी यलो अलर्ट देण्यात आले आहे. पुणे परिसरात उद्या पासून हलका पाऊस आणि ढगाळ वातावरण राहणार आहे. मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यात मेघगर्जना, विजांचा कटकडाट आणि सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवला आहे.