Pakistan Shocker: पाकिस्तानमध्ये पोलीस डीएसपीचा कारनामा; चोरीच्या मोटारसायकल विकयचा, स्टिंग ऑपरेशन करत रंगेहाथ पकडला
Photo Credit -X

Pakistan Shocker: पाकिस्तानमध्ये पोलीस डीएसपीचा एक कारनामा उघडकीस आला आहे. कराची येथील अँटी व्हेईकल लिफ्टिंग सेल (AVLC) येथे तैनात असलेल्या पोलीस उप अधीक्षक (DSP) ला चोरीच्या मोटारसायकली विकताना रंगेहाथ पकडले गेले आहे. त्याबाबतचे वृत्त एआरवाय न्यूजने दिले आहे. निजाबत हुसैन असे डीएसपीचे नाव आहे. एआरवाय न्यूजने डीएसपी निजाबत हुसैन यांच्या बेकायदेशीर कृत्यांचा पर्दाफाश करत AVLC कार्यालयात एक स्टिंग ऑपरेशन केले. त्यातून ही धक्काजायक घटना उघडकीस आली.

स्टिंग दरम्यान हे उघड झाले की डीएसपी हुसैन चोरीनंतर जप्त केलेल्या मोटारसायकली त्यांच्या मालकांना सूचित न करता गुप्तपणे ऑफलोड करत होते. स्टिंग ऑपरेशनमध्ये, सर-ए-आम टीमने डीएसपी हुसैन यांच्याकडून दोन मोटारसायकली खरेदी करण्याचा प्लॅन आखला होता. त्यात त्यांना यश मिळवले आणि मोटरसायकलींच्या विक्री व्यवहारांशी संबंधित सर्व संभाषणे आणि व्यवहार रेकॉर्ड केले. चोरीच्या कारच्या विक्रीमध्येही डीएसपी हुसैन याचा सहभाग असल्याचे काही शक्यात स्टिंग ऑपरेशनमधून उघड झाल्या.

या स्टिंग ऑपरेशनचे पडसाद संपूर्ण पोलीस खात्यात उमटले आहेत. या प्रकरणाची चौकशी सुरू झाली आहे. वरिष्ठ पोलीस अधीक्षक (SSP) एव्हीएलसी आरिफ अस्लम राव यांनी एआरवाय न्यूजकडून नोटीस मिळाल्यावर त्वरीत हस्तक्षेप केला, डीएसपी निजाबत हुसैन यांना निलंबीत केले. ते आरोपी असल्याने त्यांच्या तपास सुरू आहे.