Crime (PC- File Image)

Mumbai Crime: विवाहीत बहिणीच्या प्रियकराची हत्या करून त्याचा मृतदेह पुण्याजवळील एका निर्जनस्थळी फेकल्या प्रकरणी २५ वर्षीय तरुणाला अटक करण्यात आले आहे.  मुख्य आरोपीसह पोलिसांनी तीन जणांना ताब्यात घेतले आहे.  विवाहबाह्य अनैतिक संबंध असल्यामुळे बहिणीचा संसार उद्धवस्त झाला होता. अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव सुजित गायकवाड आहे. बहिण आणि तीचा प्रियकर एकाच कंपनीत काम करत होते. (हेही वाचा- कान फिल्म फेस्टिव्हलमध्ये रेड कार्पेटवर मॉडेलसोबत गैरवर्तन; महिलेने दाखल केली तक्रार)

मिळालेल्या माहितीनुसार, आनंद गुप्ता असं हत्या झालेल्या तरुणाचे नाव होते. तो मुंबईतील एका कंपनीत सेल्स विभागात कामाला होता. भिवंडी येथे सहकुटुंब राहत होता. 28 मे रोजी त्यांची हत्या करण्यात आली होती. सुजितची बहिण आणि आनंद यांच्यात काही वर्षांपासून प्रेम होते. हे प्रेम सुजितला मान्य नव्हता. तो नेहमी आनंदला बहिणीपासून दूर राहण्याची विनंती करायाचा परंतु त्याने एक ऐकले नाही.

यासदंर्भात बोलण्यासाठी सुजितने आनंदला भेटण्यासाठी बोलवलं होतं परंतु त्यांच्यात भांडण झालं. सुजितने आनंदला भरपूर मारहाण केली. रागाच्या भरात त्याची हत्या केली. त्याचा मृतदेह पुण्याजवळील एका खदानीत फेकला. आनंदने २८ मे रोजी कुटुंबाला माहिती दिली होती की, माणकोली येथे कोणालातरी भेटण्यासाठई जात आहे. परंतु तो घरी परतलाच नाही त्यामुळे कुटुंबांनी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल करून घेतली.

कुटुंबानी त्याचा शोध घेतला होता. कुटुंबायांनी माणकोली गाठले असता त्यांना गुप्ता यांची मोटारसायकल व रक्ताचे डाग आढळून आले. त्यानंतर ही माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल केला. पोलिसांनी शोध घेत मोबाईल मधून नंबर मिळवून सुजितला ताब्यात घेतले. ३० मे रोजी सुजितने चौकशीतून सर्व घटनेची माहिती दिबली. त्याच्यावर गुन्हा दाखल करून अटक करण्यात आले.