Narendra Modi ते MS Dhoni टीम इंडिया च्या हेड कोच पदासाठी BCCI कडे 3000 पेक्षा जास्त बनावट अर्ज- रिपोर्ट्स
BCCI Board (Photo Credit - Twitter)

भारतीय क्रिकेट संघ पुरूष  (Indian men's cricket team)चा मुख्य प्रशिक्षक म्हणून राहूल द्रविड (Rahul Dravid) याचा कार्यकाळ लवकरच संपत असल्याने बीसीसीआय ने मुख्य प्रशिक्षक पदासाठी अर्ज मागवले आहेत. ICC Men's T20 World Cup 2024 तोंडावर असताना नव्या प्रशिक्षकाचा शोध सुरू आहे. या स्पर्धेनंतर द्रविडचा कार्यकाळ संपत आहे. सोमवारी त्यासाठी अर्ज करण्याचा शेवटचा दिवस होता. या पदासाठी सुमारे 3 हजार अर्ज आले आहेत. दरम्यान बीसीसीआयला आलेल्या अर्जांमध्ये माजी क्रिकेटर एम एस धोनी, विरेंद्र सेहवाग, सचिन तेंडुलकर यांच्या नावे देखील अर्ज आले आहेत. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह यांच्या नावे देखील अर्ज आल्याचं समोर आलं आहे.

इंडियन एक्सप्रेसच्या रिपोर्ट्स नुसार, आलेले अनेक अर्ज हे खोटे आहेत. 13 मे पासून बीसीसीआयने अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया खुली केली होती. अद्याप कुणी खरंच प्रामाणिक पणे अर्ज केला आहे का? हे समजू शकलेले नाही. बीसीसीआयच्या अधिकार्‍याच्या माहितीनुसार, मागील वर्षी देखील अशाच प्रकारे बनावट अर्ज आले होते. बीसीसीआय गुगल फॉर्मवर अर्ज मागवण्याचे कारण म्हणजे याद्वारा अर्जदारांच्या नावांची एका शीटमध्ये छाननी करणे सोपे आहे. Stephen Fleming बनणार Rahul Dravid नंतर टीम इंडिया चा पुढचा मुख्य प्रशिक्षक? 

बीसीसीआयला अशा परिस्थितीला सामोरे जावे लागण्याची ही पहिलीच वेळ नाही. मागील वेळेसही जेव्हा भारतीय क्रिकेट बोर्डाने 2022 मध्ये मुख्य प्रशिक्षकासाठी अर्ज मागवले होते, तेव्हा त्यांना 5000 हून अधिक अर्ज आले होते जे बनावट होते आणि त्यांनी अर्ज करण्यासाठी सेलिब्रिटींची नावे वापरली होती.