IND vs BAN, 3rd T20I 2019 Match Live Streaming: भारत विरुद्ध बांग्लादेश तिसरा टी-20 लाईव्ह सामना आणि स्कोर पहा Star Sports आणि Hotstar Online वर

भारत (India) आणि बांग्लादेश (Bangladesh) यांच्यात खेळल्या जाणार्‍या तीन सामन्यांची टी-20 मालिकेतील आज अखेरचा सामना नागपूर (Nagpur) मध्ये खेळला जाणार आहे. या सामन्याच्या निकालानंतर या मालिकेचा विजेता कोण हे निश्चित केले जाईल. आतापर्यंत खेळलेल्या दोन सामन्यांपैकी पहिला सामना बांग्लादेशने जिंकला, तर दुसरा सामना भारतीय संघाने (Indian Team) जिंकत मालिकेत 1-1 ने बरोबरी केली. रोहित शर्मा याच्या नेतृत्वात भारतीय संघाच्या प्लेयिंग इलेव्हनमध्ये पहिल्या दोन सामन्यांमध्ये कोणताही बदल झाला नाही. भारतीय संघाला आपले क्षेत्ररक्षण सुधारण्याची गरज आहे. टीम इंडियाची आणखी एक कमकुवत बाजू या मालिकेदरम्यान पुन्हा एकदा समोर आली, तो म्हणजे रिषभ पंत. पंत खराब विकेटकिपिंग करत ज्यामुळे त्याच्यावर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. (India Vs Bangladesh 3rd T20: रोहित शर्मा घालणार 'या' नव्या विक्रमाला गवसणी; भारतीय संघातील एकाही खेळाडूला करता आली नाही अशी कामगिरी)

भारत-बांग्लादेशमधील तिसऱ्या टी-20 मॅचचं लाइव्ह प्रक्षेपण प्रेक्षकांना स्टार स्पोर्ट्स (Star Sports) 1 आणि स्टार स्पोर्ट्स 1 एचडी इंग्रजी कॉमेंट्रीमध्ये आणि स्टार स्पोर्ट्स 3 आणि स्टार स्पोर्ट्स 3 एचडी हिंदी भाषामध्ये पाहता येईल. शिवाय, लाइव्ह ऑनलाईन स्ट्रीमिंग हॉटस्टार (Hotstar) वर उपलब्ध असेल. शिवाय तुम्ही या सामन्याचे थेट प्रक्षेपण आमच्या यूट्यूब चॅनेलवर पाहू शकता.

आतापर्यंत व्हीसीए स्टेडियमवर 11 टी -20 सामने खेळले गेले आहेत आणि प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने आठ वेळा हा विजय मिळविला आहे. बांग्लादेशविरुद्ध तिसर्‍या आणि शेवटच्या सामन्यात कर्णधार रोहित संघाच्या वेगवान गोलंदाजांनी या सामन्यात आपली कामगिरी सुधारावी अशी अपेक्षा करेल, तर बांग्लादेश पहिल्या भारतीय संघाविरुद्ध टी-20 मालिका जिंकण्याचा प्रयत्न करेल. पहिल्या सामन्यात 37 आणि दुसऱ्या सामन्यात 44 धावा करणारा वेगवान गोलंदाज खलील अहमद याच्या जागी संघ व्यवस्थापन शार्दुल ठाकूर याला संधी देऊ शकेल.