भारत विरुद्ध बांगलादेश (India Vs Bangladesh 3rd T20) यांच्यातील टी-20 मालिकेतीच शेवटचा समना नागपूर (Nagpur) येथे खेळला जाणार आहे. 3 सामन्याच्या मालिकेत भारतीय संघाने 1-1 अशी बरोबरी केली आहे. यामळे तिसऱ्या सामन्यात विजय मिळवून भारतीय संघ मालिका खिश्यात घालण्याच्या तयारीने मैदानात उतरणार आहे. दुसऱ्या टी-20 सामन्यात तडाखेबाज कामगिरी करणारा रोहीत शर्मा याच्याकडे नव्या विक्रमाला गवसणी घालण्याची संधी आहे. यामुळे तिसऱ्या टी-20 सामन्यात सर्वांचे लक्ष रोहीत शर्माकडे असणार आहे. तसेच या सामन्यात रोहीत शर्माकडून मोठ्या खेळीची अपेक्षा केली जात आहे. रोहीत शर्मा नव्या विक्रमापासून केवळ 2 षटकार दूर असून आतापर्यंत भारतीय संघातील एकाही खेळाडूला अशी कामगिरी करता आली नाही.
भारत आणि बांगलादेश यांच्यात नागपूर येथे निर्णायक सामना खेळला जाणार आहे. त्यामुळे दोन्ही संघ नागपूर सामन्यात मोठ्या ताकदीने उतरतील हे निश्चित. यातच भारताच सध्याचा कर्णधार रोहीत शर्मा याच्याकडे नव्या विक्रमाला गवसणी घालण्याची संधी आहे. या सामन्यात रोहीत शर्माने केवळ 2 षटकार ठोकले तर, त्याच्या नावावर आंतरराष्ट्रीय कारकर्दीत 400 षटकार मारल्याच्या विक्रम नोंदवला जाणार आहे. आंतरराष्ट्रीय कारकर्दीत सर्वाधिक षटकार मारल्याच्या यादीत वेस्ट इंडीज संघाचा आक्रमक फलंदाज क्रिस गेल (534) हा पहिला स्थानावर आहे. तर, पाकिस्तान संघाचा खेळाडू शाहिद आफ्रिदी (476) हा दुसऱ्या स्थानावर आहे. नागपूर येथील तिसऱ्या टी-20 सामन्यात रोहीत शर्माने 2 षटकार ठोकले तर, तो जगात सर्वाधिक शतक ठोकणाऱ्यांच्या यादीत तिसऱ्या स्थानावर झेप घेणार आहे. हे देखील वाचा- Happy Birthday Prithvi Shaw: 13 व्या वर्षी केल्या 546 धावा, टेस्ट पदार्पणात शतक ठोकणाऱ्या 'वंडर बॉय' अर्थातच पृथ्वी शॉ याच्यबद्दलचे काही हटके किस्से
रोहीत शर्मा याने अनेकदा त्याच्या फलंदाजीने त्याच्या चाहत्यांना आकर्षित केले आहे. रोहित शर्मा हा केवळ तडाखेबाज खेळाडू नसून त्याच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने अनेक सामने जिंकले आहेत.