पहिल्यांदा आयसीसी (ICC) ट्रॉफी जिंकण्याची स्वप्ने बाळगणारा भारतीय महिला क्रिकेट संघ (India Women's Cricket Team) शुक्रवारी टी-20 विश्वचषकातील (T20 World Cup) पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या (Asutralia) आव्हानाचा सामना करेल. दीर्घकाळापासून सातत्यपूर्ण कामगिरी न करणे हा या भारतीय संघाचा कमकुवतपणा राहिला आहे. हरमनप्रीत कौर (Harmanpreet Kaur) च्या नेतृत्वात ऑस्ट्रेलियामधील तिरंगी मालिकेतील संघाने अंतिम फेरी गाठली. इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत एक सामना गमावला आणि अंतिम सामन्यात यजमान संघाकडून पराभव पत्करावा लागला. पण, आजपासून सुरु होणाऱ्या महिला टी-20 विश्वाचसशकच्या पहिल्या सामन्यात टीम इंडिया यजमान ऑस्ट्रेलियाविरुद्ध विजयाने सुरुवात करू पाहत असेल. ऑस्ट्रेलियाने आजवर चार टी-20 विश्वचषक जिंकले आहेत. ऑस्ट्रेलियन महिला क्रिकेट संघ गरजेते आहे आणि यंदाही स्पर्धा जिंकण्यासाठी सर्वात मोठी दावेदार मानली जात आहे. (Women's T20 World Cup 2020 Schedule: आयसीसी टी-20 विश्वचषक 2020 चे भारतीय महिला टीमचं शेड्यूल, सामने कधी आणि कुठे होणार जाणून घ्या)
महिलांच्या टी-20 विश्वचषकच्या सुरुवातीचा सामना भारतीय वेळेनुसार दुपारी दीड वाजता खेळला जाणार आहे. नाणेफेक दुपारी एकच्या सुमारास होईल. हा सामना सिडनी येथील सिडनी शोग्राऊंड स्टेडियमवर होणार आहे. हा सामना गट-अ चा पहिला साखळी सामना असेल. या सामन्याचे थेट प्रक्षेपण भारतात स्टार स्पोर्ट्स नेटवर्क आणि दूरदर्शनवर पाहिले जाऊ शकते. या सामन्याचे लाईव्ह स्ट्रीमिंग हॉटस्टारवर उपलब्ध असेल.
16 वर्षीय शेफाली वर्मा (Shafali Verma) भारताकडून चांगली सुरुवात होण्याची अपेक्षा करीत आहे, तर काही वेळापासून सातत्यपूर्ण कामगिरी करण्यात अपयशी ठरलेल्या कर्णधार हरमनप्रीतकडूनही चांगल्या कामगिरीची अपेक्षा केली जाईल. तिरंगी मालिकेच्या अंतिम सामन्यात पदार्पण करणार्या 16 वर्षीय रिचा घोषला सातत्याने संधी मिळते का हे पहावे लागेल. गोलंदाजीत भारतीय संघ फिरकीपटूंवर जास्त अवलंबून असतो आणि यंदाही पाहायला मिळेल. तिरंगी मालिकेत भारताने ऑस्ट्रेलियाला पराभूत केले होते, त्यामुळे चांगली कामगिरी करण्यासाठी त्यांच्याकडून अपेक्षा असेल.
असे आहे भारत-ऑस्ट्रेलिया महिला संघ
भारत: हरमनप्रीत कौर (कॅप्टन), तानिया भाटिया (विकेटकीपर), हरलीन देओल, राजेश्वरी गायकवाड, रिचा घोष, वेदा कृष्णमूर्ती, स्मृति मंधाना, शिखा पांडे, अरुंधति रेड्डी, जेमिमाह रॉड्रिक्स, दीप्ति शर्मा, पूजा वस्त्राकार, शेफाली वर्मा, पूनम यादव आणि राधा यादव.
ऑस्ट्रेलिया: एरिन बर्न्स, निकोला केरी, एशले गार्डनर,राचेल हेन्स (उपकर्णधार), एलिसा हीली (विकेटकीपर), जेस जोनासेन, डेलिसा किमिन्स, मेग लॅनिंग (कॅप्टन), सोफी मोलिनेक्स, बेथ मूनी, एलिसे पेरी,मेगन शुट, अॅनाबेल सदरलँड, टेयला व्लेमिंक, जॉर्जिया व्हेरहॅम.