Women's T20 World Cup 2020 Schedule: आयसीसी टी-20 विश्वचषक 2020 चे भारतीय महिला टीमचं शेड्यूल, सामने कधी आणि कुठे होणार जाणून घ्या
आयसीसी महिला टी -20 वर्ल्ड कप 2020 (Photo Credits: ICC)

Women's T20 World Cup 2020 Schedule: आयसीसी महिला टी-20 विश्वचषकचे 21 फेब्रुवारी ते 8 मार्च 2020 या कालावधीत ऑस्ट्रेलियामध्ये आयोजित केले जाईल. विश्वातील 10 संघातील सामन्यांत एकूण 23 सामने खेळले जाईल. सर्व संघांना पाच-पाचच्या गटात वाटले गेले आहे. गट ‘अ’ मध्ये भारत, न्यूझीलंड, श्रीलंका, बांग्लादेश आणि यजमान ऑस्ट्रेलियासह आहेत, तर गट 'ब' मध्ये इंग्लंडसह दक्षिण आफ्रिका, वेस्ट इंडिज, पाकिस्तान आणि थायलंड यांचा समावेश आहे. आयसीसी द्वारा आयोजित करण्यात येणारी ही स्पर्धेचे सामने चार शहरांच्या 6 मैदानावर खेळले जातील. या मैदानांमध्ये मेलबर्न क्रिकेट मैदान आणि मेलबर्नमधील जंक्शन ओव्हल, सिडनी क्रिकेट मैदान आणि सिडनीमधील शो ग्राउंड, कॅनबेरामधील मनुका ओव्हल आणि पर्थचा वाका यांचा समावेश आहे. टी-20 विश्वचषकाचा अंतिम सामना 8 मार्च, महिला दिनी मेलबर्नमध्ये खेळला जाईल. स्पर्धेपूर्वी 15 ते 20 फेब्रुवारीदरम्यान 10 सराव सामनेही होणार आहेत. (आयसीसी महिला टी -20 वर्ल्ड कप 2020 चे संपूर्ण वेळापत्रक जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा)

स्पर्धेचा पहिला सामना 21 फेब्रुवारी रोजी ऑस्ट्रेलिया आणि भारत यांच्यात सिडनी शोग्राऊंड स्टेडियमवर खेळला जाईल. ग्रुप स्टेजचे सामने 3 मार्च रोजी संपतील आणि त्यानंतर दोन्ही सेमीफायनल सामने सिडनी येथे 5 मार्चला खेळले जातील. आवाजवर ऑस्ट्रेलियाने चार आणि इंग्लंड आणि वेस्ट इंडीजने महिला टी-20 विश्वचषक एकदा जिंकला आहे. इथे पाहा भारताचे महिला टी-20 विश्वचषकमधील सर्व सामन्यांचे वेळापत्रक:

21 फेब्रुवारी, ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत, सिडनी शो ग्राउंड स्टेडियम, दुपारी 1:30 वाजता

24 फेब्रुवारी, भारत विरुद्ध बांगलादेश, डब्ल्यू.ए.सी.ए. मैदान, पर्थ, दुपारी 4:30 वाजता

27 फेब्रुवारी, भारत विरुद्ध न्यूझीलंड, मनुका ओव्हल, कॅनबेरा, दुपारी 1:30 वाजता

29 फेब्रुवारी, भारत विरुद्ध बांग्लादेश, जंक्शन ओव्हल, मेलबर्न, दुपारी 1:30 वाजता

विश्वचषक लक्षात घेऊन भारत, यजमान ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्याततिरंगी मालिका खेळली गेली होती, ज्याने दोन सामने जिंकून भारताने अंतिम फेरीत प्रवेश केला होता, परंतु यजमान ऑस्ट्रेलियाने अंतिम सामन्यात विजय मिळविला.